ETV Bharat / state

Independence Day 2023: ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील.. पुण्यातील विधानभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

author img

By

Published : Aug 15, 2023, 12:46 PM IST

Updated : Aug 15, 2023, 1:54 PM IST

Pune News
राज्यपाल रमेश बैस

भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात राज्यांमध्ये साजरा केला जात आहे. आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली.

ध्वजरोहन करताना राज्यपाल रमेश बैस

पुणे : देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 77 स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकाविला आहे. पुण्यातील विधानभवनामध्ये दरवर्षी 15 ऑगस्टला राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. त्यानुसारच हे ध्वजारोहण यावर्षी राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. तर यावेळी पुणे विभागातील अधिकारी, नागरिक, वरिष्ठ अधिकारी, माजी निवृत्त अधिकारी, यासह कर्मचारी वर्ग सुद्धा उपस्थित होते. तसेच मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजवंदनासाठी मोठा वाद : यावर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना ध्वजवंदनासाठी दुसऱ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर पुणे बालेकिल्ला असलेले अजित पवार हे मात्र कोल्हापुरामध्ये ध्वजवंदनासाठी गेले आहेत. खरेतर पुण्यात ध्वजवंदन करण्यासाठी चंद्रकांत पाटील व अजित पवार यांच्यांत जोरदार रस्सीखेच सुरू होती. आचारसंहितेनुसार राज्यपाल हे ध्वजवंदन करत असले, तरी त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री हजर असतात. यावेळेस मात्र पालकमंत्री हजर राहिले नाहीत.



राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण : राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर प्रथमच पालकमंत्री पदावरून अंतर्गत वाद सुरू असताना, 15 ऑगस्टला कोणी कोठे ध्वारोहण करायचे यासाठी सुद्धा मोठा वाद झाला. राज्य शासनाने यासाठी दोन वेळा पालकमंत्र्यांच्या यादी प्रसिद्ध केल्या आहेत. एक वेळेस पहिली यादी प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या वेळेस दुसरी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच आज भारताला स्वतंत्र पाहण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.

तात्पुरत्या पालकमंत्री पदाचाही वाद : स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा मान पालकमंत्र्यांचा असतो. परंतु एक वर्षे झाले तरीही शिंदे सरकारने राज्यातील 17 जिह्यांमध्ये पालकमंत्री अद्याप नेमलेले नाहीत. त्यातच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार यावरून शिंदे सरकारमध्ये रुसवेफुगवे दिसून आले आहेत. त्यामुळे हंगामी पालकमंत्री नेमून ध्वजारोहण उरकण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे सरकारने स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणासाठी तात्पुरत्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली होती.


हेही वाचा -

  1. Independence Day 2023: राज्यातील 186 कैद्यांची आज कारागृहातून होणार सुटका..जबाबदार नागरिक होण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन
  2. Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी आजवर कोणत्या मोठ्या घोषणा केल्या होत्या? वाचा सविस्तर
  3. Independence Day 2023: 'बीबी का मकबरा' रंगला तिरंगी रंगात, पाहा व्हिडिओ
Last Updated :Aug 15, 2023, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.