ETV Bharat / state

Third Wave of Corona : कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाने तिसऱ्या लाटेसाठी जालना आरोग्य विभाग सज्ज

author img

By

Published : Jan 6, 2022, 6:52 AM IST

Updated : Jan 6, 2022, 12:47 PM IST

Third Wave of Corona
कोरोना

कोरोनाची तिसरी आणि संभाव्य लाट ( Third Wave of Corona ) सुरू झाली असून जिल्ह्यात दररोज अंदाजे 10 ते 12 कोरोना रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे एका आठवड्यात आढळून येणारे रुग्ण आता दररोज आढळून येत असल्यानं जिल्ह्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला असून तिसऱ्या लाटेच्या तयारीला ( Third Wave of Corona in jalna ) लागला आहे.

जालना - जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत 62 हजार 181 रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्या लाटेत 13 हजार 767 रूग्ण होते. तर दुसऱ्या लाटेत 48 हजार 312 रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान आता कोरोनाची तिसरी आणि संभाव्य लाट ( Third Wave of Corona ) सुरू झाली असून जिल्ह्यात दररोज अंदाजे 10 ते 12 कोरोना रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे एका आठवड्यात आढळून येणारे रुग्ण आता दररोज आढळून येत असल्यानं जिल्ह्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला असून तिसऱ्या लाटेच्या तयारीला ( Third Wave of Corona in jalna ) लागला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे संशयित 41 रुग्ण होते. तर दोन रुग्ण परदेशातून आले असल्याने ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आलेले आहे. या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्याच्या परिस्थितीत जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही.

ऑक्सिजनची उपलब्धता -

जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजनचे पाच प्लांट उपलब्ध असून या प्लांटची क्षमता 113 मेट्रिक टन आहे. तर पीएसएम प्लांट 7 ठिकाणी असून त्या प्लांटची क्षमता 107 मेट्रिक टन एवढी आहे. उत्पादीत ऑक्सिजन साठवण करण्यासाठी छोटे-मोठे ऑक्सिजनचे सिलेंडर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. दुसऱ्या लाटेत 23 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. तेव्हाच्या ऑक्सिजनच्या तिप्पट ऑक्सिजनची गरज तिसर्‍या लाटेत पडू शकते,असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. यासाठी एकूण 69 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू शकते. या प्रमाणापेक्षा मुबलक प्रमाणात ऑक्सिजन जालना जिल्ह्यात उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत 581 ऑक्सिजन कॅपिसीटर मशीन आहेत. त्यामध्ये पाच लिटर प्रती मिनिट या क्षमतेने ऑक्सिजनची उपलब्धता करता येते. त्याच बरोबर 81 बायपॅक मशीन आहेत. 189 व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याने आरोग्य विभागाची चिंता मिटली आहे.

Jalna is ready to face Third Wave of Corona
जालनामध्ये ऑक्सिजनची उपलब्धता...

मुबलक बेड -

जालना जिल्ह्यात 4 हजार 660 बेड उपलब्ध आहेत. यामध्ये ओ2 म्हणजेच ऑक्सिजनचे 888 बेड, ICU 462 बेड, व्हेंटिलेटर बेड 179 आहेत. यामध्ये 26 बेड हे लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

Jalna is ready to face Third Wave of Corona
जालना आरोग्य विभागात मुबलक बेड उपलब्ध करण्यात आली आहेत.

लहान मुलांच्या लसीकरणाचे आव्हान -

जिल्ह्यात 16 लाख 50 हजार नागरीकांच्या लसीकरणाचे लक्ष असून त्यामध्ये 12 लाख 88 हजार एवढ्या लोकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण 78.66% ईतके आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 लाख 77 हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याचे प्रमाण 47.13% आहे.15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना 3 तारखेपासून लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 लाख 9 हजार लसिकरणाचे उदिष्ट जालना जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. 3 आणि 4 तारखेला 1हजार 670 मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 46 शाळा-कॉलेजमध्ये लसीकरण सत्र सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.

Jalna is ready to face Third Wave of Corona
कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच जालना आरोग्य विभाग सतर्क

उद्योजकांची गरजू रूग्णांना मोलाची साथ -

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जालना औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी मोलाची साथ आरोग्य विभागाला दिली. यात ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, मोफत जेवण , आरोग्य तपासणीसाठी लागणारे विविध उपकरणे उद्योजकांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाला देण्यात आले. विशेष म्हणजे, गरजू रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा जालना रोलिंग असोसिएशनने मोफत केला. त्यामुळे गरजू रूग्णांना मोठा आधार मिळाल्यानं स्टील उद्योजकांचे राज्यभरात भरभरून कौतुक झाले.

तिसऱ्या लाटेसाठी देखील जालना जिल्हा री- रोलिंग मिल असोसिएशनचे सहकार्य असणार आहे. तिसरी लाट येऊच नये, जर आलीच तर आमचे पुर्ण सहकार्य राहील. आमचे पाच ऑक्सिजन प्लँट असून 1500/1800 सिलेंडरची प्रतिदिन क्षमता आहे. जर परिस्थिती हाता बाहेर जात असेल तर आम्ही आमचे उत्पादन थांबवून शासनाच्या मागणीनुसार ऑक्सिजनची मदत करायला तयार आहोत, अशी माहिती रोलिंग मिलचे अध्यक्ष घनश्यामसेठ गोयल यांनी 'ETV भारत'ला दिली आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; एकूण रुग्णसंख्या 26 हजार

Last Updated :Jan 6, 2022, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.