ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; एकूण रुग्णसंख्या 26 हजार

author img

By

Published : Jan 5, 2022, 9:44 PM IST

Updated : Jan 6, 2022, 5:14 PM IST

राज्यात कोरोना बधितांचा आकडा 26 हजारपर्यंत ( Number of Corona Patients 26 Thousand ) पोहोचला आहे. तर ओमायक्रॉनचे 100 नवे रुग्ण ( 100 New Patients of Omicron ) सापडले आहेत. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 5538 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Public Health Department ) दिली आहे.

state corona
state corona

मुंबई - राज्यात मंगळवारी 18 हजार ( 18 Thousand Corona Cases ) रुग्ण 9 होते. गेल्या 24 तासांत सुमारे 8 हजार नव्या कोविड ( 8 Thousand New Covid Cases ) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बधितांचा आकडा 26 हजारपर्यंत ( Number of Corona Patients 26 Thousand ) पोहोचला आहे. तर ओमायक्रॉनचे 100 नवे रुग्ण ( 100 New Patients of Omicron ) सापडले आहेत. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 5538 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Public Health Department ) दिली आहे. दरम्यान आज घेतलेल्या आढावा बैठकीत मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या शहरी भागात मीनी लॉकडाऊन ( Mini Lockdown ) लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे माहिती आहे.

कोरोनाचा चढता आलेख
कोरोनाचा चढता आलेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मंगळवारी 18 हजार 466 बाधित सापडले होते. आज 26 हजार 538 कोरोना बाधितांची नोंद झाली. राज्यात यामुळे 67 लाख 56 हजार 032 इतकी आहे. तर 5331 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 24 हजार 247 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96.55 टक्के इतका आहे. दिवसभरात 8 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.9 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 97 लाख 77 हजार 007 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.68 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 14 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहे. 85 हजार 505 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
  • ओमायक्रॉनचे आतापर्यंत 144 रुग्ण

राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 100 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक 100 रुग्ण मुंबईत, 11 नागपूर, ठाणे आणि पुणे मनपामध्ये 7, पिंपरी चिंचवड 6, कोल्हापूर 5, भिवंडी, उल्हासनगर, अमरावतीत प्रत्येकी 2 आणि पनवेल, उस्मानाबादमध्ये अनुक्रमे 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 797 झाली आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

  • ओमायक्रॉनचे 330 रुग्ण घरी परतले

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 34 हजार 440 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 58 हजार 629 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 337 आणि इतर देशातील 336 अशा एकूण 673 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 2541 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 102 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

'या' विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण

मुंबई महापालिका - 15014
ठाणे - 403
ठाणे मनपा - 1851
नवी मुंबई पालिका - 1371
कल्याण डोंबिवली पालिका - 677
वसई विरार पालिका - 541
नाशिक - 103
नाशिक पालिका - 396
अहमदनगर - 79
अहमदनगर पालिका - 30
पुणे - 121
पुणे पालिका - 1835
पिंपरी चिंचवड पालिका - 577
सातारा - 173
नागपूर - 353

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई - 508
पुणे मनपा - 78
पिंपरी चिंचवड - 44
पुणे ग्रामीण - 26
ठाणे मनपा - 29
नागपूर - 24
पनवेल - 17
नवी मुंबई - 10
कोल्हापूर - 10
सातारा - 8
कल्याण - डोंबिवली - 7
उस्मानाबाद - 6
भिवंडी - ५
वसई-विरार - 4
नांदेड, अमरावती, उल्हासनगर - 3 प्रत्येकी
औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली - प्रत्येकी 2
लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड - प्रत्येकी 1

हेही वाचा - राजस्थानात एकाचा मृत्यू, काही दिवसापूर्वी होता ओमायक्रॉनग्रस्त

Last Updated : Jan 6, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.