ETV Bharat / state

Jalgaon News : तपासाकरिता जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला, वाहनावर झाड कोसळल्याने एपीआयसह चालकाचा मृत्यू

author img

By

Published : Jun 30, 2023, 7:05 AM IST

Updated : Jun 30, 2023, 8:34 AM IST

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वाहनावर झाड कोसळलं
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वाहनावर झाड कोसळलं

जळगावात जिल्ह्यातील मोठी बातमी आहे. तपासासाठी निघालेल्या जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर नियतीने डाव साधला. पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळल्याने सहायक पोलीस निरीक्षक आणि वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगावात घडली आहे. या दुर्घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला

जळगाव : जळगावात जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा पथकावर काळाने घाला घातल्याची बातमी समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या वाहनावर झाड कोसळल्याची घटना असून या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले होते. पण रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या चालत्या गाडीवर झाड कोसळले. या घटनेमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला.

कधी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक जळगाव जिल्ह्यातील पिलखोड या गावातील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात होते. या गावाकडे जात असतानाच काळाने पोलिसांवर काळाने घाला घातला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणे 9 वाजण्याच्या सुमारास अंजनी धरणालगत घडला. या दुर्घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला. तर गाडी असलेले इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाड पडल्याने पथकाच्या वाहनाची पूर्णपणे चेंदा झाला आहे. गाडीत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या घटनास्थळी पोहोचल्या.

तीन गंभीर जखमी : या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हेही घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा -

  1. Khadse On Patil : एकनाथ खडसेंकडून गुलाबराव पाटील यांच्यावर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
  2. State Board Exam: बोर्डाच्या परीक्षाकेंद्राबाहेर पुन्हा एका कॉपीबहादराची पोलिसांकडून धुलाई; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
  3. Thane Crime: जळगाव न्यायालय परिसरात गोळीबाराचा प्रयत्न करून झाला होता फरार; आरोपीला मंगला एक्सप्रेसमधून पिस्तूलसह अटक
Last Updated :Jun 30, 2023, 8:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.