ETV Bharat / state

हिंगोली-कळमनुरी महामार्गावर ३ वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू, पाच गंभीर

author img

By

Published : Aug 17, 2019, 9:50 PM IST

Updated : Aug 17, 2019, 11:07 PM IST

hingoli-accident-news-one-died-and-five-injured-in-an-accident-between-truck-bike-and-auto-near-sawarkheda

हिंगोली-कळमनुरी राज्य महामार्गावर, लासीना फाटा येथून जवळच असलेल्या सावरखेडा येथे ट्रक-दुचाकी आणि ऑटोचा विचित्र अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवले.

हिंगोली - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. हिंगोली-कळमनुरी मार्गावरील सावरखेडा गावाजवळ, रस्त्यावरील खड्डे चुकवताना हमखास अपघात घडत आहेत. आजपर्यंत याठिकाणी तीन ते चार जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे शनिवारीही झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

विचित्र अपघातात एक ठार, पाच गंभीर; हिंगोलीत अपघातांचे प्रमाण वाढले

रामेश्वर कानबाराव काईट (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, अशोक भिकाजी नवघरे, अविनाश अशोक नवघरे, जेता बाळू राठोड, रुक्मिणी जेता राठोड, लीना मनोज राठोड हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत.

हिंगोली-कळमनुरी राज्य महामार्गावर, लासीना फाटा येथून जवळच असलेल्या सावरखेडा येथे ट्रक-दुचाकी आणि ऑटोचा विचित्र अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले.

पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये ऑटो रस्त्याच्या 30 फूट बाजूला जाऊन पडली, तर दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती बासंबा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत व जखमींना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पंचनामा झाला असून, अजूनपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, सावरखेडा ते लासिना या गावापर्यंत रस्त्यावर भयंकर असे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी येथेच एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता.

अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागेच माजी खासदार शिवाजी माने यांचे वाहन येत होते. घटना घडल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावर पडलेल्या जखमींना स्वतःच्या वाहनामध्ये नेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.

Intro:विचित्र वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर


हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघाताच्या आकडेवारीत वाढच होत चालली आहे हिंगोली कळमनुरी रोड वरील सावरखेडा या गावाजवळ रस्त्यावर एवढे खड्डे पडलेत की खड्डे चुकविताना हमखास अपघात घडत आहेत. अद्यापपर्यंत याठिकाणी तीन ते चार जणांचा अपघाती मृत्यू झालाय. आजही झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत रामेश्वर कानबाराव काईट (४०) अस मयताच नाव आहे.


Body:अशोक भिकाजी नवघरे, अविनाश अशोक नवघरे, जेता बाळू राठोड, रुक्मिणी जेता राठोड, लीना मनोज राठोड हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत.
हिंगोली कळमनुरी राज्य महामार्गावर लासीना फाटा येथून जवळच असलेल्या सवरखेडा येथे ट्रक दुचाकी व ऑटोचा विचित्र अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, या मध्ये एक जण जागीच ठार झालाय. तर तीघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हासामान्य। रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर केले. हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यामध्ये ऑटो रोडच्या 30 फूट बाजूला जाऊन पडला तर अपघातात एका दुचाकी चां पूर्णपणे देखील चुराडा झालाय. अपघाताची माहिती बासंबा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमींना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. घटनेचा पंचनामा झाला असून अद्याप पर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र सावरखेडा ते लासिना या गावापर्यंत रस्त्यावर भयंकर असे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे मागील काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी एक महिला देखील दुचाकीवरून पडून मयत झाली होती.Conclusion:या वाहनांच्या त्यामध्ये माजी खासदार शिवाजी माने यांचे वाहन अडकले होते. घटना घडल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडलेल्या जखमींना त्यांनी स्वतःच्या वाहनांमध्ये उचलून टाकत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.
Last Updated :Aug 17, 2019, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.