ETV Bharat / entertainment

ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील पहिलं गाणं होईल 'या' दिवशी रिलीज... - devara part 1

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 1:24 PM IST

Devara Part 1 First Song Fear : ज्युनियर एनटीआर अभिनीत 'देवरा पार्ट 1'मधील पहिलं गाणं लवकरच रिलीज होणार आहे. तारीख जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा...

Devara Part 1 First Song Fear
देवरा पार्ट 1मधील पहिलं गाणं फेयर ('देवरा पार्ट 1' का पहला सॉन्ग 'फियर'(Karan Johar Instagram))

मुंबई - Devara Part 1 First Song Fear : साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. त्याआधी तो आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट देणार आहे. एनटीआरच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'देवरा पार्ट 1'चं पहिलं गाणं रिलीज होणार आहे. चाहत्यांना वाढदिवसापूर्वी हे गिफ्ट मिळणार आहे. 'देवरा पार्ट 1'मध्ये ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरताला शिवा यांनी केलंय. 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाबद्दल एनटीआरच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, कारण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आरआरआर' चित्रपटानंतर तो कुठल्याही चित्रपटामध्ये झळकला नाही.

गाणं कधी रिलीज होईल? : ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी 41 वर्षांचा होणार आहे. याआधी 19 मे रोजी 'देवरा पार्ट 1' चे निर्माते चित्रपटामधील पहिलं गाणं 'फियर' रिलीज करणार आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे की, रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जेलर'मधील 'हुकुम' या सुपरहिट गाण्यापेक्षा 'फियर' हे अधिक धमाकेदार असेल. 'हुकुम' हे गाणेही अनिरुद्धनेच संगीतबद्ध केलं होतं. 'देवरा पार्ट' च्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

वर्कफ्रंट : 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर अनोख्या अंदाजात दिसणार आहे. दरम्यान ज्युनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'वॉर 2' या चित्रपटामध्ये हृतिक रोशनबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. 'वॉर 2' चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. हा चित्रपट यशराज बॅनर बनवत आहे. काही दिवसापूर्वी ज्युनियर एनटीआर हा मुंबईला आला होता, यावेळी त्यानं हृतिक रोशनबरोबर डिनर केला होता.

हेही वाचा :

  1. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा जलवा, दीपिका पदुकोणच्या लूकची करुन दिली आठवण - urvashi rautela
  2. तेलंगणातील थिएटर्स 10 दिवस बंद राहणार, जाणून घ्या कारण? - Single screen theaters closed
  3. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिननिमित्त पाहा हे पाच बॉलिवूड चित्रपट - INTERNATIONAL FAMILY DAY 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.