ETV Bharat / state

Manoj Jarange Patil Z Plus Security : मनोज जरांगे पाटलांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मराठा समाजाची माणगी; नितेश राणेंचंही पत्र

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 9:09 PM IST

Updated : Nov 3, 2023, 9:41 PM IST

Z Plus Security To Jarange Patil
मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Z Plus Security : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाने धुळे शहरात रस्त्यावर उतरत शहरातून मोर्चा काढला. (Dhule Maratha Community March) जरांगेनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाज आंदोलनाचा इतिहास पाहता त्यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांना 'झेड प्लस' सुरक्षा द्यावी, अशी मागणी मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. (Jarange Patil hunger strike)

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा मोर्चा

धुळे Manoj Jarange Patil Z Plus Security : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धुळ्यात सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलनही शुक्रवारी स्थगित करण्यात आले. धुळे शहरात मराठा समाजाच्या मोर्चाला क्युमाईन क्लबपासून सुरुवात झाली. मोर्चात महिलांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा सरळ कमलाबाई हायस्कूलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन दिलं. (Maratha Community statement to Dhule District Collector) निवेदनात म्हटलं आहे की, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सलग दहा दिवस आमरण उपोषण केलं. त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका, गावागावात सर्वसामान्य जनतेनेही आंदोलन केलं. तसेच सर्व समाजातील संघटना, राजकीय पक्ष, आमदार, खासदारांनी मागणीसाठी पाठिंबा दिला.

नितेश राणेंचे पत्र : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात रान पेटवले आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून भेटणारा वाढता प्रतिसाद बघता त्यांना सुरक्षा पुरवणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहे. मनोज जरांगे पाटलांना दर दिवशी भेटण्यासाठी राज्यभरातून दहा ते पंधरा हजार मराठा कार्यकर्ते येत आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यात मागील काही दिवसांपासून हिंसक वळण लागल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांना त्वरित सुरक्षा पुरवण्यात यावी, यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न? यापूर्वी देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या मागणीसाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील, आमदार विनायक मेटे यांनी मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळावे, याकरिता अनेक आंदोलनं केली. कालांतरानं त्यांचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूबाबत समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते अशी शंका आहे. मराठा समाज आरक्षण मागणी करणार्‍या नेत्यांना ऐनकेन प्रकारे संपवलं आहे. आता मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मागणीवर सरकारला जेरीस आणलं आहे. यापूर्वी सरकारने हे आरक्षण आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यात अनेक जखमी झाले. सरकारचं आतापर्यंतचं कटकारस्थान पाहता आता मराठा समाजाचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.

म्हणून हवी 'झेड प्लस' सुरक्षा: मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी दोन पावलं मागे घेतली. मात्र, आंदोलन संपलेलं नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना संपविण्यासाठी त्यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंतचा मराठा समाजाचा इतिहास पाहता अनेक मराठा लढवय्यांना संपवण्यासाठी काही वेळेस अण्णाजी पंतांची पिलावळ जागी होतात. हा इतिहास पाहता मनोज जरांगे पाटील यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात यावी. त्यांच्या जिवाचं काही बरेवाईट झालं तर महाराष्ट्र सरकारच जबाबदार राहील, असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या: निवेदनावर सुनिता आहोळे, वनिता रायगुडे, ललिता शिंदे, अनिता वाघ, दिपाली बेंद्रे, वर्षा बेंद्रे, किरण बेंद्रे, संगिता जाधव, शोभा यादव, अरुणा मराठे, माया वाघ, भारती वाघ, संध्या जाधव, दिपा शिंदे, रूचिता गायकवाड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

हेही वाचा:

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी दोन महिन्यात डाटा गोळा करणार - मंत्री अतुल सावे
  2. Maratha Reservation : 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या - मनोज जरांगे पाटील
  3. Maratha Reservation Deadline : मराठा आरक्षणाच्या अंतिम तारखेबाबत घोळ
Last Updated :Nov 3, 2023, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.