ETV Bharat / state

Ravikant Tupkar Protest : लाठीमारविरोधात रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरुच

author img

By

Published : Feb 12, 2023, 3:52 PM IST

Updated : Feb 12, 2023, 7:07 PM IST

Ravikant Tupkar Food sacrifice Movement
रविकांत तुपकर यांचे आंदोलन

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी 11 फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुलडाणा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला गेला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्येच कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मोर्चा हा जिल्हा कचेरीवर पोहोचल्यानंतर तेथे रविकांत तुपकर यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शेतकरी आणि रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले.

रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन

बुलडाणा: सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, विदर्भातील बुलडाणा, वाशिमसह मराठवाड्यातील उस्मानाबाद व अन्य अशा 16 जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, सोयापेंड आयातीवर बंदी घालावी यासह केंद्र सरकारशी संबंधित विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. रात्री त्यांची आणि काही कार्यकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना चिखली पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आज 12 फेब्रुवारीला दुपारी एक वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रविकांत तुपकर यांचा अन्यायाविरुद्ध लढा: शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर २०२२ पासून लढा देत आहेत. ६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि त्याचा पाठपुरावा करून त्याचे पत्र केंद्राला पाठविण्यात आले.

आरपारची लढाई लढणार: २३ जानेवारी रोजी मानवत जि. परभणी येथे कापूस व सोयाबीन दरवाढीसाठी मोर्चा काढण्यात आला. तसेच हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड येथे पिकविमा आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी मोर्चे काढण्यात आले. सातत्याने आंदोलने सुरु असतानाही केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने शेवटी आरपारची लढाई लढणार असल्याचे रविकांत तुपकरांनी ४ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात झालेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले होते.

तुपकर यांची आत्मदहनाची घोषणा: त्या बैठकीतील निर्णयानुसार तुपकरांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीर करत एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र काल रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना पकडल्याने मोठा अनर्थ टाळला.

हेही वाचा : Anganwadi Worker Suicide : धक्कादायक! अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Last Updated :Feb 12, 2023, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.