ETV Bharat / state

Anganwadi Worker Suicide : धक्कादायक! अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

author img

By

Published : Feb 11, 2023, 9:13 PM IST

Updated : Feb 11, 2023, 10:38 PM IST

अधिकाऱ्याकडून शारीरिक सुखाची मागणी व तीन वर्षापासून पगार थकल्याच्या कारणाने अंगणवाडी सेविकाने केली आत्महत्या केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे राहणाऱ्या अंगणवाडी सेविकेने हे धक्कादायक पाऊल उचले.

Anganwadi worker commits suicide
अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

नंदुरबार: जिल्ह्यातून दुःखद घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अलका वळवी या अंगणवाडी सेविकेने एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील अधिकाराच्या शारीरिक सुखाच्या मागणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या अंगनवाडी सेविकेचे मागील 3 वर्षांपासून वेतन थकित होते. तिने वेतनसाठी विचारणा केली असता आयसीडीएस अधिकाऱ्यांकडून तिला त्रास दिला जात होता. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली.


शारिरीक सुखाची मागणी : कोरोना महामारीनंतर अनेक अंगणवाडी सेविका या आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जे कोविडयुद्धे काम करत होते. त्यामध्ये अंगणवाडी सेविका देखील महत्त्वाच्या भूमिका निभावत होत्या. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका अलका वळवी यांना गेल्या तीन वर्षापासून महिला बालविकास विभागाकडून पगार दिला गेला नव्हता. तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी देखील केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने तालुका शहादा गाव म्हसावद येथील जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे.

थकित वेतनाची मागणी : अलका वळवी या महिलेने थकित वेतनासाठी आयसीडीएस अधिकाऱ्यांकडे विचारणा पण केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी तिला मानसिक त्रास दिल्यामुळे तसेच शारीरिक सुखाची मागणी केल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तोरणमाळ या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगला देखील अलका वळवी ही अंगणवाडी सेविका असल्याने हजर झाली होती.

जाच सहन झाला नाही : जुगनी गाव, हेरीचा पाडा व तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील ही आत्महत्या करणारी अलका वळवी 33 वय वर्षे वयाची अंगणवाडी सेविका गेल्या तीन वर्षापासून अनेकदा एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडे निवेदन करून व्यथित झाली होती. तिच्या पतीला देखील हा जाच तिने सांगितला होता. मात्र तिला हा जाच आता सहन झाला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या अ‍ॅड. निशा शिवूरकर यांनी सांगितले.

शरीर सुखाची मागणीमुळे बसला धक्का : अंगणवाडी सेविकने इतके टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय हे ईटीव्ही भारतने विचारले. दरम्यान, या संदर्भातली त्या ठिकाणच्या स्थानिक अंगणवाडी सेविकेने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शरीर सुखाचे देखील मागणी अलका वळवी हिच्याकडे केली होती. त्यामुळे तिला याबाबत धक्काच बसला.

महिलेने उचलेले टोकाचे पाऊल : अधिक माहितीसाठी विचारले असता या संदर्भात त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केलेली मागणी तसेच तीन वर्षे थकित वेतन या सर्व विवंचनेत महिला होती. दरम्यान, ती तिच्या पतीसोबत दुचाकी वाहनाने ती जात होती आणि तिने नवऱ्याच्या गाडीवर जात असताना गाडीवरून मागून जोरात उडी मारली आणि धाडकन खाली कोसळली. नवऱ्यानेच राणीपूर या तिथल्या स्थानिक दवाखान्यात दाखल केले. मात्र तेथून जवळच मात्र शहादा तालुक्यातील म्हसवड गावाच्या या सरकारी छोट्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या महिलेला तपासून मृत घोषित केल्याचे तिच्या पतीने सांगितल्याची माहिती देखील अंगणवाडी कर्मचारी सभेकडून माहिती प्राप्त झाली आहे.

आरोपीस कठोर शिक्षा व्हावी : अंगणवाडी कर्मचारी महासभेच्या नेत्या अ‍ॅड. निशा शिवकर यांनी ईटीव्ही भारतसोबत सवांद करताना सांगितले की, हा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाबद्दल कठोर चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच तीन वर्षे अंगणवाडी सेविकेचा पगार थकवला जातो हे देखील भयंकर आहे. शासनाने या संदर्भात तातडीने युद्ध पातळीवर चौकशी करून दोषी व्यक्तीस शिक्षा केली पाहिजे.

हेही वाचा : Crime News : महिलेची छेड काढल्यामुळे केले दोघा भावांचे टक्कल, 7 जणांना अटक

Last Updated :Feb 11, 2023, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.