ETV Bharat / state

Sikkim Flash Flood : सिक्कीममधील ढगफुटीत बीडचा जवानही बेपत्ता; संपर्क होत नसल्यानं कुटुंब हादरलं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 9:17 AM IST

Updated : Oct 6, 2023, 9:54 AM IST

Sikkim Flash Flood : सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळं तिस्ता नदीला महापूर आलाय. यात सैन्याचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. यात महाराष्ट्रातील बीडच्या एका जवानाचाही समावेश आहे.

Sikkim Flash Flood
जवान पांडुरंग वामन तावरे

बीड Sikkim Flash Flood : सिक्कीममध्ये मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. त्यात त्याठिकाणी असलेले अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्याचबरोबर त्याठिकाणी नदीच्या परिसरामध्ये लष्कराची छावणी होती, तीही पुरात वाहून गेली तसंच तीथं उभी असलेली त्यांची 41 वाहनंही या पुरात वाहून गेली आहेत. याठिकाणी कर्तव्यावर असलेले 25 जवान या पुरामध्ये वाहून गेले असून त्यामधील दोन जण सापडले आहेत. या ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. पती बेपत्ता झाल्यानं त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय हादरलं आहे.


ढगफुटीमुळं तिस्ता नदीला पूर : सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळं तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी अचानक 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती, ती पुरामध्ये वाहून गेली. तसंच तीथं उभी असलेली सैन्य दलाची वाहनंही या पुरात बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे हे बेपत्ता झाले आहेत. जवान पांडुरंग वामन तावरे हे मुळचे पाटोदा तालूक्यातील काकडहिरा या गावचे आहेत.

आतापर्यंत देशाच्या अनेक भागात सेवा : पांडुरंग वामन तावरे हे 2009 मध्ये आर्मीमध्ये भरती झालेले आहेत. मागील 14 वर्षांपासून ते महार बटालियन (18) मध्ये नायक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी देशातील दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुनाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब विविध ठिकाणी देशची सेवा केली. मागील 2 महिन्यांपूर्वी सिक्कीममधील गंगटोक येथे कर्तव्यासाठी गेले होते. त्याठिकाणी मंगळवारी रात्री ते बंगाल बॅंकडुगी युनिटकडं निघाले होते. ते स्वतः एका वाहनाचे चालक होते. दरम्यान त्यांनी मंगळवारी रात्री 9.30 वाजता त्यांच्या पत्नी गोदावरी यांना मोबाईल वर संपर्क साधला, चर्चा केली. बुधवारी 1.30 ते 2.00 च्या सुमारास सिक्कीम येथील ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला. त्यात जवान वाहून गेल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. दोन दिवसांपासून जवानांचे प्रमुख सुभेदार मेजर यांच्यासमवेत संपर्क होत आहे. परंतू, ज्याठिकाणी लष्कर छावणी होती, त्या ठिकाणी संपर्क होत नसल्याच्या सूचना बंगाल बॅंकडुगी युनिट येथून मिळली असल्याचं जवान पांडूरंग तावरे यांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Sikkim Flash Flood : सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत पुरात 14 जणांचा मृत्यू तर शेकडो जण बेपत्ता
  2. Sikkim Flash Floods Update : तिस्ता नदीत 17 मृतदेह सापडले, ढगफुटीमुळं अनेक जण बेपत्ता
  3. 23 Army Jawan Missing : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर, सैन्याचे २३ जवान बेपत्ता
Last Updated : Oct 6, 2023, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.