ETV Bharat / bharat

Sikkim Flash Flood : सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत पुरात 14 जणांचा मृत्यू तर शेकडो जण बेपत्ता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:41 AM IST

Updated : Oct 5, 2023, 1:32 PM IST

Sikkim Flash Flood
Sikkim Flash Flood

Sikkim Flash Flood : सिक्कीम सरकारनं या महापुराला आपत्ती घोषित केलंय. त्याचवेळी, सोशल मीडियावर पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं की, केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे. तसंच सर्व पीडितांच्या आरोग्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रार्थनाही केली.

गंगटोक / नवी दिल्ली Sikkim Flash Flood : उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर ढगफुटीमुळे तिस्ता नदीला अचानक पूर आल्यानं किमान 14 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 22 लष्करी जवानांसह सुमारे 102 नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यूमुखी पडलेल्या 10 नागरिकांची ओळख करण्यात आली असून, त्यापैकी तीन उत्तर बंगालमध्ये वाहून गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सकाळी बेपत्ता झालेल्या 23 सैनिकांपैकी एकाला बाचावण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

  • 14 people dead, 102 missing and 26 injured in the flash floods in Sikkim: Govt of Sikkim

    — ANI (@ANI) October 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

3000 हून अधिक पर्यटक अडकले : चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पहाटे दीडच्या सुमारास सिक्कीममध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही. बी. पाठक यांनी सांगितलं की, देशाच्या विविध भागांतील 3,000 हून अधिक पर्यटक राज्याच्या विविध भागात अडकले असल्याची माहिती आहे. पाठक म्हणाले की, चुंगथांग येथील तिस्ता फेज 3 धरणावर काम करणारे अनेक कर्मचारीही अडकून पडले आहेत. पुरामुळं रस्ते पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पुरात एकूण 14 पूल कोसळले आहेत, त्यापैकी नऊ सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) अंतर्गत आहेत आणि पाच राज्य सरकारचे असल्याची माहिती मुख्य सचिव व्ही. बी. पाठक यांनी दिलीय.

  • The Indian Army has started three helplines for families of missing people in Sikkim including its own soldiers. The numbers are given below:

    Army Helpline No for North Sikkim - 8750887741

    Army Helpline for East Sikkim - 8756991895

    Army Helpline for missing soldiers -… pic.twitter.com/JBkhrcgVPo

    — ANI (@ANI) October 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आतापर्यंत 166 जणांची सुटका : आणखी एका अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं की, आतापर्यंत सुमारे 166 जणांची सुटका करण्यात आली असून यात एका लष्करी जवानाचाही समावेश आहे. बचाव करण्यात आलेल्या जवानाची प्रकृती स्थिर असल्यचं संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितलंय. बचाव कर्मचार्‍यांनी सिंगताममधील गोलितार येथील तिस्ता नदीच्या पुराच्या भागातून अनेक मृतदेह बाहेर काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पी एस तामांग यांच्याशी बोलून राज्यातील अचानक आलेल्या पुरामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही पंतप्रधानांनी दिल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलंय.

  • Spoke to Sikkim CM Shri @PSTamangGolay and took stock of the situation in the wake of the unfortunate natural calamity in parts of the state. Assured all possible support in addressing the challenge. I pray for the safety and well-being of all those affected.

    — Narendra Modi (@narendramodi) October 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केले दुःख व्यक्त : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं की, सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. एस. तमांग यांच्याशी बोललो आणि राज्याच्या काही भागात दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. मी प्रभावित झालेल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो, असंही मोदींंनी आपल्या ट्विटममध्ये म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही बेपत्ता सैनिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीय. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीनं (NCMC), सिक्कीममधील परिस्थितीचा आढावा घेतला आणि बोगद्यात अडकलेल्या पर्यटक आणि लोकांना बाहेर काढण्यावर भर दिलाय.

41 वाहन अडकली : सिक्कीम सरकारनं एक अधिसूचना काढत याला आपत्ती घोषित केलं आहे. संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलंय की, चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यामुळं तलावातील पाण्याची पातळी अचानक 15 ते 20 फुटांनी वाढली. लष्कराचे 22 जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि 41 वाहने चिखलात अडकली आहेत. सिक्कीम आणि उत्तर बंगालमध्ये तैनात असलेले इतर सर्व भारतीय लष्कराचे कर्मचारी सुरक्षित आहेत, परंतु मोबाईल संप्रेषणात व्यत्यय आल्यानं ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत नाहीत," असं संरक्षण अधिकाऱ्यानं सांगितलंय.

हेही वाचा :

  1. 23 Army Jawan Missing : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर, सैन्याचे २३ जवान बेपत्ता
  2. Avalanche In Sikkim : सिक्कीममध्ये हिमस्खलनात 6 पर्यटकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
  3. Earthquake In Sikkim : सिक्कीममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 एवढी तीव्रता
Last Updated :Oct 5, 2023, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.