ETV Bharat / state

नामविस्तार दिन : फक्त एका नावासाठी सलग १७ वर्षे चालेला हा लढा जगातील एकमेवाद्वितीय

author img

By

Published : Jan 14, 2020, 5:52 AM IST

मराठवाडा विद्यापीठ गोर गरिबांसाठी शिक्षणाचे दार उघडणारे विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. त्या विद्यापीठाला त्यांचंच नाव देण्यासाठी त्यांच्या अनुयायांना 17 वर्ष रस्त्यावर लढा द्यावा लागला. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना तुरुंगात जावे लागले. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत उभारलेला लढा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज( 14 जानेवारी) 26 वा नामविस्तार दिन आहे. मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात असला तरी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी तब्बल 17 वर्षे लढा द्यावा लागला. या लढ्यात शिपाई पासून तर साहेबांपर्यंतच्या वर्गातील लोक सहभागी झाले होते.

फक्त एका नावासाठी सलग १७ वर्षे चालेला हा लढा जगातील एकमेवाद्वितीय

सरकारला कुठलेही पैसे खर्च करायचे नव्हते, ना कुठला निधी उभारायचा होता. फक्त विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे होते. मात्र, त्याला देखील काही तत्कालीन समाजसुधारकांनी विरोध केल्याने 17 वर्ष लढावे लागले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले लागल्याचा अनुभव नामांतर लढ्यात सहभागी आंदोलक रामेश खंडागळे, यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

मराठवाडा विद्यापीठ गोर गरिबांसाठी शिक्षणाचे दार उघडणारे विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. त्या विद्यापीठाला त्यांचंच नाव देण्यासाठी त्यांच्या अनुयायांना 17 वर्ष रस्त्यावर लढा द्यावा लागला. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना तुरुंगात जावे लागले. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत उभारलेला लढा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा. 1978 मध्ये नामांतराच्या लढ्याला सुरुवात झाली. त्यावेळच्या मंत्रिमंडळाने एकमुखाने मागणी मान्य देखील केली. मात्र, त्यावेळच्या उच्चशिक्षित घटकाने याला जातीवादी स्वरूप देण्याचा प्रयत्न करत विरोध केला. मराठवाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याचवेळी इथे विद्यापीठ असावे असा त्यांचा आग्रह होता.

हेही वाचा - 'शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा आणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये'

त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे या निमित्ताने उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठाची स्थापना झाल्याने या विद्यापीठाला त्यांचेच नाव द्यावे अशी मागणी सुरू झाली. 1978 मध्ये नामांतराच्या लढ्याला सुरुवात झाली. तब्बल 17 वर्षांच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी अखेर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असे नामांतर केले.

आज हे विद्यापीठ गोर गरिबांची शिक्षणाची भूक भागवत असले तरी त्यांच्या नावाला साजेल असा दर्जा अद्याप मिळालेला नसल्याची खंत रमेश खंडागळे यांनी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा अशी मागणी आता असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 14 जानेवारी रोजी 26 वा नामविस्तार दिन साजरा केला जाणार आहे. मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात असला तरी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव देण्यासाठी तब्बल 17 वर्षे लढा द्यावा लागला.


Body:या लढ्यात शिपाई पासून तर साहेबांपर्यंतच्या वर्गातील लोक सहभागी झाले होते. एक वेगळाच लढा नामांतराचा असून सरकारला कुठलेही पैसे खर्च करायचे नव्हते, ना कुठला निधी उभारायचा होता. फक्त विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचे होते मात्र त्याला देखील काही त्याकाळच्या समाजसुधारकांनी विरोध केल्याने 17 वर्ष लढावं लागलं त्यामध्ये अनेकांना आपले प्राण द्यावे लागले असल्याचा अनुभव त्याकाळचे नामांतर लढ्यात सहभागी असणाऱ्या रामेशभाई खंडागळे यांनी ईटीव्हीला सांगितला.


Conclusion:मराठवाडा विद्यापीठ गोर गरिबांसाठी शिक्षणाचं दार उघडणार विद्यापीठ जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होत. त्याच विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यासाठी त्यांच्या अनुयायांना 17 वर्ष रस्त्यावरचा लढा द्यावा लागला. अनेकांना आपले प्राण द्यावे लागले, तर अनेकांना तुरुंगात जावं लागलं. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत उभारलेला लढा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा. 1978 मध्ये नामांतराच्या लढ्याला सुरुवात झाली. त्यावेळच्या मंत्रिमंडळाने एकमुखाने मागणी मान्य देखील केली मात्र त्यावेळच्या उच्चशिक्षित घटकाने याला जातीवादी स्वरूप देण्याचा प्रयत्न करत विरोध केला. मराठवाड्यातील गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याच वेळी इथे विद्यापीठ असावं असा त्यांचा आग्रह होता. त्यानंतर बराच प्रयत्नानंतर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे या निमित्ताने उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठाची स्थापना झाल्याने या विद्यापीठाला त्यांचंच नाव द्यावं अशी मागणी सुरू झाली. 1978 मध्ये नामांतराच्या लढ्याला सुरुवात झाली. तब्बल 17 वर्षांच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी अखेर मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अस नामांतर केलं. आज हे विद्यापीठ गोर गरिबांची शिक्षणाची भूक भागवत असलं तरी त्यांच्या नावाला साजेल असा दर्जा अद्याप मिळालेला नसल्याची खंत रमेशभाई खंडागळे यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा अशी मागणी आता असेल असं रमेशभाई खंडागळे यांनी सांगितलं.

byte - रमेशभाई खंडागळे - नामविस्तार आंदोलक.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.