ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले.... - Deputy CM Ajit Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 10:54 PM IST

Updated : May 24, 2024, 11:03 PM IST

Deputy CM Ajit Pawar : पुणे शहरातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

Deputy CM Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार (Reporter)

पुणे Deputy CM Ajit Pawar : पुणे शहरातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे शहराचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या घटनेत कुठल्याही राजकीय पक्षाचा तसेच राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर असून अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अस यावेळी अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कार अपघाताच्या घटनेवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)

गृहमंत्र्यांचे घटनेवर जातीनं लक्ष : पुण्यातील धायरी येथे एका शोरुम चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये जी घटना घडली त्याच्या संदर्भात २० तारखेला मुंबईचं शेवटं मतदान होतं. मी 21 तारखेला आणि 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो. माझा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं. देवेंद्रजी म्हणाले, मी तातडीने पुण्याला निघालेलो. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः जातीनं त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली; कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की, याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. कोणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो. आजही 21 तारखेला सकाळी नऊला मंत्रालयात होतो.

माझा चुकीच्या कामांना विरोधच : उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, कल्याणी नगर येथील घटनेच्या बाबत पोलीस आयुक्त वेळोवेळी मला माहिती देत होते. यामध्ये त्या अल्पवयीन तरुणाला बेल कसा मिळाला हेही तुम्हाला माहीत आहे. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या. आता बेल न्यायालयाने का द्यावा तो न्यायालयाचा प्रश्न आहे; परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढे सगळ्या गोष्टीत ज्या काही भूमिका घ्यायला पाहिजे तशा पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत. त्याच्यात कोणीही राजकीय हस्तक्षेप केले जात नसून पारदर्शक पद्धतीने काम सुरू असल्याचं यावेळी पवार म्हणाले. तसेच पुण्यात काही ठिकाणी अनधिकृतपणे पब संस्कृती ही वाढली आहे. याबाबत जोरात ॲक्शन सुरू करण्यात आलं आहे. माझं नेहमी चुकीच्या कामाला विरोध असतो. यात पोलिसांनी देखील कुठेही वेगळं काम करू नये, असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. आमदार शून्य, खासदार एक अन् रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रिपदाचं वेध - RPI President Ramdas Athawale
  2. ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न, पण गाडी अल्पवयीन मुलानेच चालवली - पुणे पोलीस आयुक्त - Pune Hit And Run Case Update
  3. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन; वरिष्ठांना वेळेत माहिती न दिल्याचा ठपका - Pune Hit and Run
Last Updated : May 24, 2024, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.