ETV Bharat / state

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 23, 2021, 8:15 PM IST

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. अनिस गफूर पठाण व संगीता दळवे अशी मृतांची नावे आहेत.

पैठण (औरंगाबाद) दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. अनिस गफूर पठाण (वय ४५) रा. बीड ह. मु. आपतगाव (ता.औरंगाबाद) व संगीता दळवे (वय ४५) रा. इस्लामपूरा बीड अशी मृतांची नावे आहेत.

रस्त्यावर असलेल्या वळनाचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. या अपघातामध्ये दोघांचांही मृत्यू झाला. दरम्यान शनिवारी सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. या घटनेची पाचोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मृत दोघेही एका हॉटेलमध्ये काम करत होते, घरी जाताना हा अपघात झाला आहे.

12 तास मृतदेह घटनास्थळीच पडून

हा अपघात शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास घडला, या घटनेतील मृत अनिस गफूर पठाण (वय ४५) रा. बीड ह. मु. आपतगाव (ता.औरंगाबाद) व संगीता दळवे (वय ४५) रा. इस्लामपूरा बीड यांचा रस्त्यावरील वळनाचा आंदाज न आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या रस्त्यावर फरशी वाहतूक नसल्याने संध्याकाळी हा अपघात झाल्याचे कोणालाही कळाले नाही. दरम्यान शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या एक व्यक्तीने हॉटल चालकाला या अपघाताची माहिती दिली. तोपर्यंत सुमारे 12 तास हे मृतदेह घटनास्थळीच पडून होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.