ETV Bharat / state

लोकसभा जागा कोणालाही गेली तरी भाजपा ५१ टक्के मतं घेण्याचा प्रयत्न करणार - बावनकुळे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 12:19 PM IST

Bawankule On BJP Voting Percent
बावनकुळे

Bawankule On BJP Voting Percent: लोकसभा जागा कोणाला सुटली तरी प्रत्येक मतदार संघात भाजपा ५१ टक्के मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे दिली. (BJP State President) प्रत्येक लोकसभा मतदार संघात भाजपाचे ६०० वॉरियर्स तैनात करण्यात आले आहेत. (Chandrasekhar Bawankule)

भाजपाच्या वोटिंग टक्केवारीविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Bawankule On BJP Voting Percent: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेनऊ वर्षांत केलेलं काम प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी काम केलं जाणार असून जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचं काम करणार असल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलं. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपा एका राज्यात आघाडीवर असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, देशात भाजपा नंबर एकचा पक्ष असून पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये देखील आघाडीवरच असेल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे अंदाज समोर आले असले आणि भाजपा पिछाडीवर असल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात निकालात भाजपाच नंबर एकचा पक्ष ठरेल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)

शेतकरीच माहिती देतील : पंतप्रधान फसल योजना ही फसवणारी योजना असल्याची टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान फसल योजनेचा फायदा होतो की नाही हे ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यांनाच विचारायला पाहिजे, असे म्हटले. एक रुपयात पीक विमा भरून पीक नुकसानीची भरपाई पंतप्रधानांच्या योजनेमध्ये आहे. या योजनेचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.


अजित पवारांंच्या दाव्यावर बोलणार नाही : शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला. त्यावर बोलणे बावनकुळे यांनी टाळले. कोणी काय प्रयत्न केले हे पाहण्यासाठी मी तिथे नव्हतो. त्यामुळे याबद्दल मी काही बोलू शकणार नाही असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा राजीनामा परत घ्यावा यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौप्यस्फोट केला आहे; मात्र या विषयावर बोलण्यास बावनकुळे यांनी टाळाटाळ केली. हा विषय आपल्याशी संबंधित नसल्याचं ते बोलले.

हेही वाचा:

  1. मराठा आरक्षण आंदोलन; मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत आहेत, मागासवर्गीय आयोगाची नाराजी
  2. राष्ट्रवादीतील वाद प्रकरण; प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाची ऑफर कुणी दिली ? जयंत पाटलांचा अजित पवारांना सवाल
  3. अजब लग्नाची गजब कहानी, मुलीनं हट्ट धरताच वऱ्हाडी आले चक्क रिक्षातून!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.