ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: बच्चू कडू यांनी उपकाराची परतफेड अपकाराने केली, शिवसैनिकांची टीका

author img

By

Published : Jun 30, 2022, 11:34 AM IST

Updated : Jun 30, 2022, 11:48 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला ( Chief Minister Uddhav Thackeray Resignation ) . पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पुरती हादरली असताना बच्चू कडू यांच्यावर अनेक स्तरातून टिका होत आहे. बच्चू कडू यांनी केलेली गद्दारी ही उपकाराची परतफेड अपकाराने करण्याचा प्रकार असल्याची टीका अमरावतीच्या शिवसैनिकांकडून केली जात आहे.

bachchu_kadu
बच्चू कडू

अमरावती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ( Chief Minister Uddhav Thackeray Resignation ) दिला. पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पुरती हादरली असताना बच्चू कडू यांच्यावर अनेक स्तरातून टिका ( Criticism on Bachchu Kadu ) होत आहेत. स्वतःला शिवसैनिक म्हणणारे प्रहारचे नेते आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना केवळ शिवसेनेमुळे मंत्रीपद मिळाले. असे असताना देखील बच्चू कडू यांनी केलेली गद्दारी ही उपकाराची परतफेड अपकाराने करण्याचा प्रकार असल्याची टीका अमरावतीच्या शिवसैनिकांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात दोन वेळा शिवसैनिक आणि बच्चू कडू आमने-सामने - लोकसभेच्या 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू हे अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार होते. त्यावेळी अमरावतीत असलेले शिवसेनेचे खासदार अनंत गुडे ( Anant Gude ) यांच्या विरोधात ते निवडणूक रिंगणात उतरले होते. पहिल्यांदाच राजकीय पटलावर आलेल्या बच्चू कडू यांची पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्याला ओळख झाली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचा गड असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या ताकदीने बच्चू कडू यांचा पराभव केला होता. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly elections ) अचलपूर मतदारसंघात जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गुढे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले असताना त्यांची थेट लढत बच्चू कडू यांच्यासोबत होती. त्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंद गुढे हे पराभव केला. शिवसैनिकांनीच गुढे विजयी होऊ नये यासाठी बच्चू कडू यांना पाठबळ दिले असल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. असे असले तरी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळाले असताना अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक ( Shiv Sainik ) बच्चू कडू यांनाच आपला नेता मानत आले आहेत. बच्चू कडूंबाबत हळूहळू व्यक्त होत आहेत.

मनीषा टेंबरे

जनतेमधून रोष - उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आले असताना देखील शिवसेनेतील बंडखोरांना सोबत असणारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्याचे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात शिवसैनिकांनी अद्याप एक शब्द देखील उच्चारला नाही. बच्चू कडू यांच्या विरोधात जिल्ह्यात कुठेही शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटली नसताना आता मात्र केवळ कट्टर शिवसैनिक हळूहळू बच्चू कडू यांच्याविरोधात बोलायला लागले आहेत. बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा मान मिळाला तो केवळ शिवसेनेमुळे ( Shiv Sena ) मात्र बच्चू कडू यांनी गद्दारी केली. उपकाराची परतफेड उपकाराने करणाऱ्या बच्चू कडू यांचा मी तीव्र शब्दात निषेध नोंदवतो असे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मनीषा टेंबे आणि वर्षा भोयर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हटले आहे. बच्चू कडू यांच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून प्रतिक्रिया उमटली असताना बच्चू कडू यांच्या भूमिकेबाबत जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक मौन बाळगूनच आहेत.

हेही वाचा - BJP-Will-Claim-Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

Last Updated : Jun 30, 2022, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.