ETV Bharat / state

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे तिळमात्र विचार उरले नाहीत-रवी राणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 10:59 AM IST

MLA Ravi Rana on Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच कारसेवक असल्याचा फोटो सोशल मिडीयावर प्रसारित केला होता, यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी ट्विट करत उत्तर दिलंय. या वादात आता आमदार रवी राणा यांनी उडी घेतलीय. अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं कवडीचंही योगदान नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

MLA Ravi Rana on Sanjay Raut
MLA Ravi Rana on Sanjay Raut

आमदार रवी राणा

अमरावती MLA Ravi Rana on Sanjay Raut : अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरात उद्धव ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं कवडीचंही योगदान नसल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केलीय. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच कारसेवक असल्याचा फोटो सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. यावरुन संजय राऊत यांनी त्यांना एक्स मीडियावर पोस्ट करत उत्तर दिलं होतं.

काय म्हणाले आमदार रवी राणा? : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक कारसेवक होते. बाबरीचा विध्वंस करताना ते मशिदीवर चढले होते. राममंदिराच्या लढाईत फडणवीस पुढंच होतं. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यामुळं तसंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यामुळं राम मंदिराचं काम पूर्ण होत आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय.


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे अगदी जवळचे संबंध होते. बऱ्याचदा अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करत होते. तर बाळासाहेब ठाकरे सुद्धा बऱ्याचदा अटलजींची स्तुती करत होते. त्यांच्यात स्नेहसंबंध आणि जिव्हाळा होता. त्यामुळं त्यांचे संबंध दीर्घकाळ टिकले होते-आमदार रवी राणा

उद्धव ठाकरेंनी आंदोलन केल्याचं एक तरी पोस्ट दाखवा : उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत कोणत्याच प्रश्नावर केव्हाच आंदोलन केलं नाही. शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी ते केव्हाच रस्त्यावर उतरले नाहीत. या संदर्भातील एक तरी पोस्ट संजय राऊत यांनी करावं. संजय राऊत हे स्वतः निवडून येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. म्हणुन ते राज्यसभेवर जातात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे विचार पूर्णतः विकले आहेत. शिवसेना इतका मजबूत पक्ष असतानासुद्धा पक्षप्रमुखांना दिल्लीला जाऊन जागांसाठी भीक मागावी लागते. एवढी दयनीय अवस्था आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे तिळमात्र विचार उरले नसल्याची घणाघाती टीका आमदार राणा यांनी केलीय.



हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचं सरकार तयार झालंय; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
  2. भाजपानं राम मंदिराचं मंगल कार्यालय करुन ठेवलंय; संजय राऊतांचा घणाघात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.