ETV Bharat / state

Amaravti Crime News : शेतमालकाकडून शेतातील रखवालदाराची हत्या

author img

By

Published : Mar 19, 2022, 7:57 PM IST

अमरावती पोलीस
अमरावती पोलीस

घटनेची माहीती मिळताच बडनेरा पोलिसांनी तत्काळ मारेकरी ( Badnera arrested accused in Amaravati ) वृध्दाला अटक केली. विठ्ठल अमृत काकडे ( ७० रा. निंभोरा, संजीवनीनगर ) असे अटक केलेल्या मारेकरी वृध्दाचे आहे. विठ्ठल काकडेने शहरातील अकोली भागात असलेल्या संजीवनीनगर परिसरातील एक शेत मक्त्याने कसण्यासाठी घेतले आहे. याच शेतात काकडेचा गोठा आहे.

अमरावती - ७० वर्षीय वृद्धाने त्याच्या शेतात रखवालदारीचे काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा विळ्याने गळा चिरुन खून केला. शुक्रवारी रात्री उशिरा रात्री एका बडनेरा पोलीस ठाण्याच्या ( Badner Police ) हद्दीत येणाऱ्या अकोली येथील संजीवनी नगर भागात ही घटना घडली. रंगपंचमीच्या रात्री या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सुनिल मालवे (४०, रा. जनुना) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.


पोलिसांनी केली आरोपीला अटक
घटनेची माहीती मिळताच बडनेरा पोलिसांनी तत्काळ मारेकरी ( Badnera arrested accused in Amaravati ) वृध्दाला अटक केली. विठ्ठल अमृत काकडे ( ७० रा. निंभोरा, संजीवनीनगर ) असे अटक केलेल्या मारेकरी वृध्दाचे आहे. विठ्ठल काकडेने शहरातील अकोली भागात असलेल्या संजीवनीनगर परिसरातील एक शेत मक्त्याने कसण्यासाठी घेतले आहे. याच शेतात काकडेचा गोठा आहे. त्या ठिकाणी गुरे ठेवली आहेत. याच गुरांच्या रखवालदारीसाठी मागील दोन महिन्यांपासून मालवे यांना नोकरीवर ठेवले होते. दरम्यान काकडेसुध्दा गोठ्याजवळच राहत होता.

हेही वाचा-Mumbai : कुर्लात पुरी भाजी विक्रेत्याचे ग्राहकाशी भांडण; चिमुकलीसह वृद्धावर फेकले उकळते तेल

गळ्यावर विळ्याने वार
रंगपंचमीच्या रात्री गोठ्यावर असतानाच काकडे व मालवे दोघे दारू पिले असताना त्यांच्यात वाद झाला. याच वादातून काकडेने मालवेच्या गळ्यावर विळ्याने वार केला. यावेळी मालवेचा गळा चिरल्यामुळे गंभीर जखम झाली. मालवे घटनास्थळीच रक्तबंबाळ झाले. या घटनेची माहीती बडनेरा पोलिसांना मिळाली. माहीती मिळताच ठाणेदार बाबाराव अवचार हे तातडीने घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जावून आवश्यक प्रक्रिया पुर्ण केली. तसेच विठ्ठल काकडेला ताब्यात घेवून अटक ( accused arrested in Amaravati ) केली आहे.

हेही वाचा-Jayant Patil Answered To Imtiaz Jaleel : आधी एमआयएमने हे सिद्ध करावे की, ते भाजपाची बी टीम नाही - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.