ETV Bharat / city

Jayant Patil Answered To Imtiaz Jaleel : आधी एमआयएमने हे सिद्ध करावे की, ते भाजपाची बी टीम नाही - जयंत पाटील

author img

By

Published : Mar 19, 2022, 4:40 PM IST

Updated : Mar 19, 2022, 6:52 PM IST

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या ( Samajwadi Party ) बहुतांश ठिकाणी पराभवाला एमआयएम ( AIMIM ) कारणीभूत आहे. त्यामुळे एमआयएमने सिद्ध करायला हवे की, ते भाजपची बी टीम नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील ( Jayant Patil Answer To Imtiaz Jaleel ) यांनी इम्तीयाज जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

MIM Mahavikas Aghadi Alliance
MIM Mahavikas Aghadi Alliance

मुंबई - उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या ( Samajwadi Party ) बहुतांश ठिकाणी पराभवाला एमआयएम ( AIMIM ) कारणीभूत आहे. त्यामुळे एमआयएमने सिद्ध करायला हवे की, ते भाजपची बी टीम नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील ( Jayant Patil Answer To Imtiaz Jaleel ) यांनी इम्तीयाज जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे. जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा केला होता. हे सर्व दावे, पाटील यांनी खोडून काढले.

प्रतिक्रिया

राजकीय वातावरण तापले -

आमच्यावर नेहमीच भाजपाची बी टीम म्हणून टीका केली जाते. पण आता आम्ही भाजपाला हरवण्यासाठी तुम्हाला युतीची ऑफर दिली आहे. तुम्ही तुमची भूमिका सिद्ध करा. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो, असे इम्तियाज जलील सांगत राजकीय वातावरण तापवले होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जलील यांच्या विधानांचा समाचार घेतला.

'राष्ट्रवादीची ती संस्कृती नाही' -

पाटील म्हणाले की, राजेश टोपे इम्तियाज जलील यांच्याकडे गेले होते. त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले म्हणून ते गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रेत नाही. मला खात्री आहे की, राजेश टोपेंनी तशी ती केलेली नसावी. कोणाच्याही घरी निधन झाले असताना अशा चर्चा करण्याची राष्ट्रवादीची संस्कृती नाही, असे पाटील यांनी सांगितले.

'एमआयएम भाजपची बी टीम' -

उत्तरप्रदेश असो की महाराष्ट्र असो, यामध्ये एमआयएमयचा प्रयत्न सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे, हे स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीत ते नेमके भाजपला जिंकवणार आहेत की हरवणार आहेत. ते आता कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या बहुतांश ठिकाणी पराभवाला एमआयएम कारणीभूत आहे. एमआयएमने सिद्ध करायला हवे की त्यांना भाजपच्या विजयात कोणताही रस नाही. त्यांनी समविचारी पक्षांना अपेक्षित भुमिका घ्यायला हवी. त्यांनी विखारी भाषा वापरू नये, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा - राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी..

Last Updated :Mar 19, 2022, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.