ETV Bharat / state

Yashomati Thakur News: भाजपा युवा मोर्चाचा आतताईपणा, फाडले आमदार यशोमती ठाकूर यांचे बॅनर

author img

By

Published : Aug 14, 2023, 7:09 PM IST

Updated : Aug 14, 2023, 8:08 PM IST

Yashomati Thakur News
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे बॅनर

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे बॅनर फाडले

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी नुकतीच पूर्ववत करण्यात आली आहे. त्यानंतर बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर 'यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है' असा संदेश दिला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ अमरावती शहरात लावण्यात आलेले बॅनर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले.

अमरावती : मोदी सरकारवर हुकूमशहा अशी टीका करणाऱ्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे बॅनर युवा मोर्चाने फाडल्याची घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. नरेंद्र मोदी जिंदाबाद, यशोमती ठाकूर मुर्दाबाद, काँग्रेस मुर्दाबाद भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा देत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नवीन बायपास रोड विद्यापीठ चौकाच्या पुलावर लावलेले बॅनर फाडले. त्यावरील सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्यही या कार्यकर्त्यांनी पाहिले नाही. राहुल गांधींची खासदारकी बहाल झाल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नसल्याचे यातून दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी लावलेले बॅनर फाडले : द रियल जननायक, सत्यमेव जयते, केंद्र सरकारच्या हुकूमशाहीच्या दबावाला बळी पडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है. लढेंगे, भिडेंगे, जितेंगे मगर नही झुकेंगे, असे बॅनर काँग्रेसच्या वतीने येथील विद्यापीठ चौकात लावण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाला याबाबत माहिती मिळाली असता, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री बादल कुळकर्णी यांच्या नेतृत्वाखाली, कार्यकर्त्यांनी पुलावर चढून हातोडी आणि ब्लेडचा वापर करून यशोमती ठाकूर यांनी लावलेले बॅनर फाडले.



राहुल गांधी यांना दिलासा : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने एका खटल्यामध्ये शिक्षा सुनावली होती. अशावेळी कायद्यानुसार त्यांची संसदेची सदस्यता रद्द करण्यात आलेली होती. मात्र याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने बदलून राहुल गांधी यांना दिलासा दिला होता. मात्र हे सर्व प्रकरण न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने घडले होते. तरीसुद्धा या प्रकरणात केंद्र सरकार हुकूमशहा आहेत असे बॅनर यशोमती ठाकूर यांनी लावले होते.


बॅनर फाडून आंदोलन : भारतीय जनता युवा मोर्चा असे प्रकार सहन करणार नाही. त्यामुळे आज अमरावती येथील विद्यापीठ चौकात नॅशनल हायवेच्या पुलावर असलेले आक्षेपार्ह बॅनर फाडून आंदोलन केले. सदर आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री बादल कुळकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजयुमो शहर सरचिटणीस भूषण हरकूट, उपाध्यक्ष तुषार चौधरी, उपाध्यक्ष शुभम वैष्णव, संगम गुप्ता, श्याम साहू, अखिलेश किल्लेदार, कुणाल टिकले, सौरभ पिंपळकर, रोहित काळे, आकाश कवीटकर, मंदार नानोटी, ऋषिकेश चौबे, नंदू मगणे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Yashomati Thakur Death Threat: तुमचाही दाभोलकर करण्याची ट्विटवरून धमकी, यशोमती ठाकूर म्हणाल्या...
  2. Yashomati Thakur Criticizes BJP : मणिपुरात हैवानाचे राज्य; दोन महिलांवर सामूहिक बलात्कार प्रकरणी यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका
  3. Yashomati Thakur Criticism on Gov : ललित मोदी आणि नीरव मोदी चोरच; माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका
Last Updated :Aug 14, 2023, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.