Yashomati Thakur Criticism on Gov : ललित मोदी आणि नीरव मोदी चोरच; माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

By

Published : Apr 1, 2023, 8:46 PM IST

thumbnail

बुलडाणा : खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला व जागोजागी आंदोलन करण्यात आले. केलेल्या कारवाईचा निषेध देखील केला जात आहे. यातच आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा निरव मोदी व ललित मोदी चोरच आहे, असा पुनरुच्चार करीत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लोकशाही धोक्यात आणल्याचे तसेच सूडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकार तसेच विरोधी पक्षावर केला. राहुल गांधी यांची पाठराखण करीत आम्ही प्रश्न विचारत राहू, असाही सज्जड दम दिला. यावेळी राज्यातील सरकारवरसुद्धा जोरदार हल्ला चढवत, फडणवीसांना खडेबोल सुनावले. राज्य सरकारसुद्धा मूग गिळून गप्प बसले आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.