ETV Bharat / state

Nitesh Rane : हिंदूंना लक्ष केले जात असेल तर आम्ही शांत बसणारे नाहीत - आमदार नितेश राणे

author img

By

Published : Aug 8, 2022, 8:04 PM IST

MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणे

प्रतीक पवारवर झालेला हल्ला हा नुपूर शर्माचे (Nupur Sharma) समर्थन केल्यामुळेच झाला. असा आरोप करत, भाजपचे आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आज अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. 'हिंदूंना अशा पद्धतीने लक्ष केले जात असेल (if Hindus are being targeted), तर आम्ही शांत बसणारे नाहीत', (We will not sit idly)असेही यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील प्रतीक पवार याने नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) संदर्भात टाकलेल्या पोस्टमुळे त्याचावर हल्ला झाला असल्याचे, यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहे. त्याला लक्ष्य करण्यात आले असुनच पोलिसांना याचा योग्य तपास करावा लागेल. पोलिसांकडून खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत. हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन पोलिसांनी तपासावे. तसे न करता पोलीस, प्रतीक पवारच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे भासवित आहे. पोलिसांनी दबावात काम करू नये. कोणीही पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. 'हिंदूंना अशा पद्धतीने लक्ष केले जात असेल (if Hindus are being targeted), तर आम्ही शांत बसणारे नाहीत',(We will not sit idly) असेही यावेळी नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी सांगितले.

प्रतिक्रीया देतांना आमदार नितेश राणे


कर्जत येथील प्रतीक पवार या व्यक्तीवर गेल्या तीन दिवांसापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला प्रतीक पवारने नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळेच झाला. असा आरोप करत, भाजपचे आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी आज अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. अहमदनगर जिल्ह्यात अल्पसंख्यांक मंत्री पालकमंत्री म्हणून नाहीत. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे दबावात काम करू नका. अहमदनगर जिल्ह्यात नुपूर शर्मांच्या नावाखाली एका युवकावर हल्ला झाला. या युवकाबरोबर हल्लेखोरांची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. त्याचे पुरावेही आहेत. तरीही हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दर्शविले जात आहे. हे चुकीचे आहे. पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नुपूर शर्मा प्रकरणातून झालेला असल्याचे सांगितले असतांना, पोलीस प्रकरण दडपत असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला आहे.



दरम्यान, आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन प्रतीक पवारच्या तब्बेतीची चौकशी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की , आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा. आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे, असा इशारा राणे यांनी दिला. मी प्रतीकला भेटलो. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला डॉक्टरांनी 24 तास निगरानी खाली ठेवायला सांगितले आहे. त्याला अन्य कारणांमुळे मारहान झाली, असे पोलिसांचे म्हणणे खोटे आहे. 'तू हिंदू-हिंदू करतोस, नुपूर शर्माचा डिपी ठेवतोस', असे म्हणून, हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांबरोबरील प्रतीकचे चॅट पोलिसांनी पहावे, असे राणेंनी स्पष्ट केले. राज्यात आता हिंदुत्त्वाला माननारे सरकार आहे. हिंदूंना अशा पद्धतीने लक्ष केले जात असेल, तर आम्ही शांत बसणारे नाहीत. त्यामुळे कोणी घाबरू नये. असे प्रकार घडल्यास हिंदुत्त्वादी संघटना व पोलिसांकडे तक्रार करावी. कोणी मस्ती करायचा प्रयत्न करू नये. जास्त मस्ती कराल, तर लक्षात ठेवा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या प्रकरणावर त्यांचे लक्ष आहे. जास्त मस्ती कराल तर सर्व प्रकारचे औषध या सरकार जवळ असल्याचा इशाराही, नितेश राणे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : Bhandara rape case : लाखनी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली; शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.