Bhandara rape case : लाखनी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली; शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा आरोप

author img

By

Published : Aug 8, 2022, 5:58 PM IST

Manisha Kayande

लाखनी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली नसती तर, भंडारा येथे झालेले सामूहिक अत्याचार ( Bhandara Yethe mass atrocity ) हे थांबविता आला असाता, असा आरोप शिवसेनेच्या ( Shiv Sena ) आमदार मनीषा कायंदे ( Shiv Sena MLA Manisha Kayande ) यांनी केला आहे.

भंडारा - लाखनी पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात गांभीर्य ठेवले असते तर भंडारा येथे झालेले सामूहिक अत्याचार ( Bhandara Yethe mass atrocity ) हे थांबविता आले असते, असा आरोप शिवसेनेच्या ( Shiv Sena ) आमदार मनीषा कायंदे ( Shiv Sena MLA Manisha Kayande ) यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिसांवर झालेल्या आरोपांची भंडारा उपविभागिय पोलिस अधिकारी संजय पाटिल ( Sanjay Patil ) मार्फत चौकशी सुरु आहे. पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार असल्याचे स्पष्ठ संकेत भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिले आहे.

मनीषा कायंदे

भंडारा मध्ये अत्याचार झालाच नसता - गोरेगाव येथे पीड़ित महिलेवर बलात्कार ( Woman victim raped in Goregaon ) झाल्यानंतर पीड़ित महिला लाखनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असतांना पोलीस पाटलाने याची माहिती लाखनी पोलीस विभागाला दिली. लाखनी पोलिसांनी त्या महिलेला लाखनी पोलीस स्टेशनमध्ये आणले. तिथे तिची विचारपूस केली मात्र, ती कोणतीही उत्तर देत नसल्याने तीन मानसिक दबावाखाली असेल तिला आरामाची गरज आहे असं समजून तिला लाखनी पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आले. सकाळी तिच्याशी पुन्हा चर्चा करून काय झालं या विषयाची माहिती घेऊ असं पोलिसांनी ठरवलं. मात्र, भल्या पहाटेच ही महिला कोणालाही न सांगता निघून गेली असल्याचं सीसीटीव्ही दिसत आहे. ही महिला आढळल्यानंतर पोलिसांनी जर गांभीर्य दाखविले असते तर, पहिल्या अत्याचाराची घटना पुढे आली नसती. पोलिसांनी काळजी घेतली असती तर ही घटना झालीच नसती असा आरोप शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे. सध्या राज्यात कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसताना भंडारा येथील एसपींना राजकीय द्वेषापोटी बदली केल्याने सहा दिवस जिल्हाला पोलीस अधीक्षक नव्हते. त्यामुळेच या पोलिसांचा हलगर्जी पणा दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा - MH cabinet Expansion :अखेर ठरलं! 'या' दिवशी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

उपविभागीय अधिकारी करीत आहेत चौकशी - तिच्यावर वेळेत लक्ष दिल्यास दूसरा झालेला बलात्कार टाळता आला असता असा, आरोप शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायांदे यांनी केल्यावर लाखनी पोलिसांची अक्षम्य चूक समोर आली होती. प्रसार माध्यमानी हा मुद्दा धरून ठेवल्यावर लाखनी पोलिसांवर चहुबाजूने टिका होउ लागली आहे. आता नव नियुक्त पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले असून याची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत सुरु झाली केली आहे. यात चौकशी अंति कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ठ संकेत पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : सेनने बॅडमिंटनमध्ये भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य; मलेशियाच्या आंग जे योंगवर केली मात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.