ETV Bharat / state

देवाच्या दारात जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 11:02 PM IST

Radhakrishna Vikhe criticized
राधाकृष्ण विखे पाटील

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

शिर्डी : अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरेंना निमंत्रण न दिल्यानं खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. बाबरीचं घुमट पाडलं, तेव्हा भाजपा सदस्यांनी पळ काढल्याचा आरोप राऊत यांनी केला. तसंच बाबरी पाडल्याची जबाबदारी शिवसेनेनं घेतली, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केलीय.

कोणाच्याही आमंत्रणाची वाट पाहता : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणाची वाट का पाहत आहात? तुम्ही आधीच शरयू नदीत राजीनामा देऊन गेलात. तुम्हाला आता राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही. औरंगजेब तुमच्या काळात श्रेष्ठ झाला, अशी कठोर टीका विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. तसंच देवाच्या दारात जाण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. फक्त तुमच्या मनात श्रद्धा हवी असते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मोदींची विरोधकांना भीती : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधान मोदींना भगवान विष्णूच्या दहाव्या अवताराची उपमा दिली होती. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर आता विखे यांनी पलटवार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यात त्यांना एक तलवार भेट दिली. ज्यावर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरले होते. ज्यावेळी पृथ्वीवर काही अपप्रवृत्ती येतात, तेव्हा भगवान विष्णू त्यांचा नायनाट करतात. कदाचित आता विरोधकांना त्याची भीती वाटत असावी. पंतप्रधान मोदी लोकशाही मार्गानं ही विकृती खोडून काढतील, या भीतीनं विरोधक टीका करत असल्याचा हल्लबोल त्यांनी खासदार संजय राऊतांवर केलाय.

48 जागांपैकी 42 जागा जिंकणार : महायुतीचं सरकार इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देईल, याची आता मराठा समाजाला खात्री झाली आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भाषा करणं योग्य नाही. जरांगे पाटलांनी मुंबईत नव्हे, तर मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढावेत, असं म्हणत विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तसंच राज्यातील 48 जागांपैकी 42 जागा महायुतीच्या लोकसभेवर निवडून येतील, असा विश्वास विखे यांनी यावेळी व्यक्त केला.

मोफत मास्क वाटप : साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाला संस्थानच्या वतीनं मोफत मास्क वाटप करण्याच्या सुचना विखे पाटील यांनी दिल्या आहे. नो मास्क नो साई दर्शन असं धोरण साईबाबा संस्थानच्या वतीनं राबवण्यात यावं. तसंच जे मास्क घालणार नाही त्यांना दर्शनासाठी मंदिरात न सोडण्याच्या सुचनाही संस्थानला दिला.

हेही वाचा -

  1. महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला उद्यापासून प्रारंभ; शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात होणार सभा
  2. 'ये गप रे, बस खाली', जितेंद्र आव्हाडांनी केली अजित पवारांची नक्कल
  3. राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री येणार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.