ETV Bharat / state

Anna Hazare On Jitendra Awhad : अण्णा हजारे आणि जितेंद्र आव्हाड वाद पेटला; अण्णा हजारे दाखल करणार अब्रू नुकसानीचा खटला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 8:14 AM IST

Anna Hazare On Jitendra Awhad
संपादित छायाचित्र

Anna Hazare On Jitendra Awhad : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्यानं वाद उफाळून आला आहे. या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

अहमदनगर Anna Hazare On Jitendra Awhad : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होते. या प्रकरणी अण्णा हजारे यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि अण्णा हजारे यांचा वाद आणखी चिघळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

  • Maharashtra | On NCP leader Jitendra Awhad's tweet, Activist Anna Hazare says, "If it is said that the country has suffered losses because of me, then I have made so many laws which have benefited the people of the country. Due to some of my movements, some of their workers… pic.twitter.com/vRAGoeCZ7D

    — ANI (@ANI) October 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त ट्विट : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत 'या माणसांनं देशाचं वाटोळं केलं, गांधी टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही, असं ट्विट केलं होतं. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अण्णा हजारे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

  • ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले
    टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही pic.twitter.com/hDLIsSW8g9

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले अण्णा हजारे : राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अण्णा हजारे यांचा चांगलाच संताप झाला. माझ्यामुळे देशाचं नुकसान झालं असं म्हटलं जाते, तर माझ्यामुळे अनेक कायदे करण्यात आले आहेत. या कायद्याचा फायदा देशातील जनतेला झाला. माझ्या आंदोलनांमुळे देशाचं नुकसान झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड करत आहेत. माझ्या आंदोलनामुळे त्यांच्या अनेक लोकांचं नुकसान झालं आहे, ते नाकारू शकत नाही. जितेंद्र आव्हाडांच्या पक्षातील अनेक नेत्यांना माझ्यामुळे घरी जावे लागले आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील नेत्यांचं नुकासन आव्हाड सहन करू शकत नाहीत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी करत आहेत. मात्र याचा मला काही फरक पडत नाही. मी वकिलाचा सल्ला घेऊन माझ्यामुळे देशाचे नुकसान झालं असं म्हणणार्‍यांवर मानहानीचा दावा दाखल करेन. वकिलाशी बोलल्यानंतर मी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणत्या प्रकारचा खटला दाखल करता येईल, त्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे, असं अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Wine Selling Issue : अण्णा हजारें सोमवार पासून करणार शेवटचे बेमुदत उपोषण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.