ETV Bharat / city

Wine Selling Issue : अण्णा हजारें सोमवार पासून करणार शेवटचे बेमुदत उपोषण

author img

By

Published : Feb 9, 2022, 12:55 PM IST

Updated : Feb 9, 2022, 6:39 PM IST

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Social activist Anna Hazare) यांनी महाराष्ट्र सरकारच्या (Government of Maharashtra) सुपरमार्केट आणि स्टोअर्समध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाविरोधात 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची (indefinite hunger strike) घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलेकी,आतापर्यंत मी आयुष्यात 22 वेळा समाज हितासाठी उपोषण आंदोलन केले आता हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं उपोषण आंदोलन असेल

Wine Selling Issue
Wine Selling Issue

अहमदनगर- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून राज्यात सुपरमार्केट, मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याच्या धोरणा वर, हा निर्णय मागे न घेतल्यास येत्या सोमवार 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आणि ओपन वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे स्मरणपत्र पाठवले आहे. अण्णांनी या विषयी एक पत्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले होते त्याला उत्तर न मिळाल्याने त्यांनी पहिले आणि आज दुसरे असे चार पत्र पाठवले आहेत, मात्र राज्य सरकारकडून अजून अण्णांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता आण्णा पुन्हा आमरण उपोषणच्या आपल्या आयुधावर येत सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. त्यांनी आमरण उपोषणाचा निर्वानीचा इशारा दिला आहे.

अण्णा हजारें


युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे
युवाशक्तीला जपण्याचे काम समाजाने, सरकारने केले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने तंबाखू सारख्या गोष्टी सर्वत्र उपलब्ध केल्याने आजकाल लहान मुलेही तंबाखूचे व्यसनाधिन होत आहेत त्याच पद्धतीने जर वाईन एक किरकोळ पद्धतीने सर्रास दुकानांमधून विकली जाणार असेल तर मुले, युवक ही राष्ट्राची युवाशक्तीची आहे ती ही या वाईनची चव चाखेल. आणि या सर्व युवा शक्तीचा ऱ्हास होईल याची कल्पना सरकारला हवी आणि त्याची जबाबदारीही सरकारने समोर ठेवून वाइन विक्रीचा निर्णय बदलावा अशी मागणी अण्णांनी केली.

  • Social activist Anna Hazare announces an indefinite hunger strike from 14 February against the Maharashtra government over its decision to sell wine supermarkets and walk-in stores. pic.twitter.com/Zv79JD8iYm

    — ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
22 आंदोलने केली आता हे शेवटचे!आतापर्यंत मी आयुष्यात 22 वेळा समाज हितासाठी उपोषण आंदोलन केले आता हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं उपोषण आंदोलन असेल जे ही समाजासाठी असेल असंही अण्णांनी यावेळी नमूद केलंयअण्णांनी पाठवलेले पत्र..काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे.

विविध क्षेत्रातून निर्णयाला कडाडून विरोध
गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही.

पंतप्रधानां प्रमाणेच एकाही पत्राचे उत्तर नाही
यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठविली आहेत. तसेच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्यासंबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. आपणाकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडूनही तसेच घडताना दिसत आहे. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेले नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचे उत्तर देणे टाळले जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणेघेणे आहे की नाही? असा प्रश्न उभा राहतो.

समविचारी कार्यकर्त्यांची बैठक लवकरच
राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना पाहता वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर आंदोलन करावेच लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल.

आमची संस्कृती धुळीला मिळेल
लहान बालक ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. या बालकांमध्ये उद्याचे महापुरूष आहेत. सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन ठेवली तर ही बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील आणि ते अधोगतीकडे जातील. आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधू संतानी, राष्ट्रीय महापुरूषांनी अतोनात प्रयत्न करून संस्कृती जतन करून वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानामध्ये वाईन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल. आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून 14 फेब्रुवारी 2022 रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषण करीत आहे.

हेही वाचा : Anna Hazare Wrote Letter to CM : अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना वाईन निर्णयासंदर्भात स्मरणपत्र; दिला उपोषणाचा इशारा

Last Updated : Feb 9, 2022, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.