ETV Bharat / sports

FIFA U-17 Womens World Cup : नवीन पटनायक यांनी फिफाच्या यजमान शहराचा अधिकृत लोगो केला जारी

author img

By

Published : Sep 10, 2022, 6:55 PM IST

फिफा अंडर-17 महिला विश्वचषक ( FIFA U-17 Womens World Cup ) 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान देशभरातील तीन शहरांमध्ये होणार आहे. शनिवारी फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या यजमान शहराचा अधिकृत लोगो जारी केला.

FIFA U-17
फिफा अंडर-17

भुवनेश्वर: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक ( Odisha CM Naveen Patnaik ) यांनी शनिवारी फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या यजमान शहराचा अधिकृत लोगो जारी ( The official logo of FIFA host city ) केला. भुवनेश्वर हे तीन यजमान शहरांपैकी एक आहे. जेथे फिफा अंडर-17महिला विश्वचषक स्पर्धा ( FIFA U-17 Womens World Cup ) होणार आहे. ही स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ओडिशा, गोवा आणि महाराष्ट्रात खेळवली जाईल. भारतात होणारी ही पहिलीच फिफा स्पर्धा आहे.

यावेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक पटनायक ( Chief Minister Naveen Patnaik Patnaik ) म्हणाले, ओडिशा हे क्रीडा क्षेत्राचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे ही राज्यासाठी मोठी संधी आहे. जगातील सर्वोत्कृष्ट तरुण महिला फुटबॉलपटूंचे यजमानपद भूषवताना आम्हाला आनंद होत आहे.

हेही वाचा - Icc T20 World Cup 2022 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 बद्धल सर्वकाही जाणून घ्या, फक्त एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.