ETV Bharat / sports

ओडिशामध्ये उभारण्यात येणार भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम

author img

By

Published : Dec 24, 2020, 5:59 PM IST

indias largest hockey stadium to be built in rourkela odisha
ओडिशामध्ये उभारण्यात येणार भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम

ओडिशाच्या राऊरकेला येथे देशातील सर्वात मोठा आणि विश्वस्तरीय हॉकी स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे.

भुवनेश्वर - ओडिशाच्या राऊरकेला येथे देशातील सर्वात मोठा आणि विश्वस्तरीय हॉकी स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २० हजार इतकी असणार असून या स्टेडियमचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे पटनायक यांनी सांगितलं.

सन २०२३ ला पुरूष हॉकी विश्व कप होणार आहे. या स्पर्धेच्या सामन्याचे आयोजन राऊरकेला स्टेडियममध्ये केले जाणार आहे. राऊरकेला येथील बिजू पटनायक टेकनिकल विश्वविद्यालयाच्या परिसरात १५ एकरवर हे स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री पटनायक यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही घोषणा केल्यानुसार ओडिशा पुन्हा एकदा २०२३ मध्ये पुरूष हॉकी विश्व कप स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. या स्पर्धेचे सामने भुवनेश्वर आणि राऊरकेला येथील स्टेडियमवर खेळली जातील.

भारतीय हॉकीसाठी योगदान म्हणून मी राऊरकेला येथे २० हजार प्रेक्षक क्षमता असणारा स्टेडियम उभारण्यात येईल, याची घोषणा करत आहे. मला आशा आहे की, हे स्टेडियम जगातील सर्वश्रेष्ठ स्टेडियममधील एक ठरेल, असे देखील पटनायक यांनी सांगितलं.

हेही वाचा - भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम; गावसकर यांचा गंभीर आरोप

हेही वाचा - IND Vs AUS : सिडनी कसोटीवर कोरोनाचे सावट; ऑस्ट्रेलिया बोर्डाने घेतला 'हा' निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.