ETV Bharat / sports

Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागला आयसीसीकडून मोठा सन्मान, 'ही' उपलब्धी मिळवणारा केवळ नववा भारतीय!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 4:54 PM IST

Updated : Nov 13, 2023, 5:01 PM IST

Virender Sehwag : आयसीसीनं सोमवारी 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये तीन नवीन नावांची घोषणा केली. यात टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा समावेश आहे. वाचा पूर्ण बातमी..

Virender Sehwag
Virender Sehwag

नवी दिल्ली Virender Sehwag : भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयसीसीनं आज सेहवागला मोठा सन्मान दिला. वीरेंद्र सेहवागचा आयसीसीच्या (ICC) 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या यादीत समाविष्ट होणारा तो केवळ नववा भारतीय ठरला.

'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये तिघांचा समावेश : आयसीसीनं सोमवारी 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये तीन नवीन नावांची घोषणा केली. यात टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग, भारताची डायना एडुलजी आणि श्रीलंकेचा सुपरस्टार अरविंदा डी सिल्वा यांचा समावेश आहे. या तिघांच्या समावेशानंतर या यादीतील खेळाडूंची संख्या आता ११२ वर पोहचली आहे.

आयसीसीचं आभार मानले : हा सन्मान मिळाल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं आयसीसीचं आभार मानलं. "मला या सन्मानासाठी पात्र ठरवल्याबद्दल मी आयसीसी आणि ज्युरींचं आभार मानू इच्छितो. माझ्या आयुष्याचा मोठा भाग मला जे आवडतं ते करण्यात घालवल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. मी माझं कुटुंब, मित्र तसंच ज्या लोकांसोबत मी क्रिकेट खेळलो त्यांचं आणि माझ्यासाठी निस्वार्थपणे प्रार्थना करणाऱ्या असंख्य लोकांचे आभार मानू इच्छितो", असं सेहवाग म्हणाला.

सेहवागनं भारतीय क्रिकेटला आक्रमकता शिकवली : वीरेंद्र सेहवागनं भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. त्यानंच आजच्या भारतीय फलंदाजांना आक्रमकता शिकवली, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. तो भारतीय संघाचा धोकादायक सलामीवीर फलंदाज होता. त्यानं आपल्या १०४ कसोटींच्या शानदार कारकिर्दीत एकूण २३ कसोटी शतकं झळकावली. २००८ मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावांची त्याची खेळी ही आजपर्यंतच्या कोणत्याही भारतीय खेळाडूची सर्वोच्च धावसंख्या आहे.

वनडेमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड : सेहवागचा एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्डही तितकाच उत्कृष्ट आहे. त्यानं २५१ वनडे सामन्यात एकूण ८,२७३ धावा केल्या. २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची २१९ धावांची खेळी त्या वेळी वनडेतील सर्वात मोठी धावसंख्या होती. यानंतर २०१३ मध्ये रोहित शर्माने २६४ धावांची खेळी करत हा विक्रम मोडला.

हेही वाचा :

  1. Cricket world cup 2023 IND vs NED : प्रेक्षकांची मागणी अन् भारतीय फलंदाज बनले गोलंदाज; दोघांनी घेतली विकेट
  2. Cricket World Cup 2023 : टीम इंडियाकडून देशाला 'दिवाळी गिफ्ट', नेदरलॅंडचा १६० धावांनी पराभव
  3. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोहलीच नंबर १! बनला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
Last Updated : Nov 13, 2023, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.