ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : टीम इंडियाकडून देशाला 'दिवाळी गिफ्ट', नेदरलॅंडचा १६० धावांनी पराभव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 1:41 PM IST

Updated : Nov 12, 2023, 10:24 PM IST

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात भारतानं नेदरलॅंडचा १६० धावांनी दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं ५० षटकात ४१० धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात, नेदरलॅंडचा संघ ४७.५ षटकात २५० धावांवर ऑलआऊट झाला. ९४ चेंडूत १२८ धावा करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला.

Cricket World Cup 2023 IND vs NED
Cricket World Cup 2023 IND vs NED

बंगळुरू Cricket World Cup 2023 : २०२३ च्या विश्वचषकात भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. भारतीय संघानं शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला. विश्वचषकात भारताचा हा सलग नववा विजय आहे. टीम इंडियानं पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सलग नऊ सामने जिंकलेत.

टीम इंडियाची दमदार फलंदाजी : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना टीम इंडियानं ५० षटकांत ४ गडी गमावून २१० धावा केल्या. भारताच्या ओपनर्सनं १०० धावांची दमदार सलामी दिली. शुभमन गिल ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ५१ धावा ठोकून बाद झाला. रोहितनं पुन्हा एकदा आपल्या बॅटचा जलवा दाखवत ६१ धावांचं योगदान दिलं. विराट कोहलीनंही ५६ चेंडूत ५१ धावा केल्या.

अय्यर-राहुलची शतकं : त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरनं सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्यानं विश्वचषकातलं आपलं पहिलं शतक ठोकलं. तो ९४ चेंडूत १२८ धावा करून नाबाद राहिला. दुसऱ्या टोकावर केएल राहुलनंही शतकी खेळी केली. तो फक्त ६४ चेंडूत १०२ मारून बाद झाला. अशाप्रकारे भारतानं ५० षटकात ४ गडी गमावून ४१० धावा रचल्या. नेदरलॅंडकडून बास डी लीडेनं ८२ धावा देत २ बळी घेतले.

भारताच्या ९ खेळाडूंनी गोलंदाजी केली : टीम इंडियानं दिलेलं ४११ धावांचं मोठं लक्ष्य नेदरलॅंडला पेलवलं नाही. त्यांचे फलंदाज नियमित अंतरानं बाद होत गेले. नेदरलॅंडकडून एकट्या तेजा नदामानुरुनं अर्धशतकी खेळी केली. तो ३९ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीनं ५४ धावा करून बाद झाला. सिब्रांड एंजेलब्रेक्टनं ८० चेंडूत ४५ धावांचं योगदान दिलं. भारतानं आजच्या मॅचमध्ये तब्बल ९ खेळाडूंना गोलंदाजीची संधी दिली. कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनीही गोलंदाजीत हात आजमावला. विशेष म्हणजे, विराट आणि रोहितनं १-१ विकेट आपल्या नावे केली. तर बुमराह, सिराज, कुलदीप आणि जडेजानं प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
  • नेदरलँड्स : मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ यष्टिरक्षक), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 IND vs NED : विश्वचषकात अपराजित राहून दिवाळी धमाका करण्यासाठी टिम इंडिया उतरणार मैदानात
  2. Cricket World Cup 2023 : पाकिस्तानच्या हरिस 'रौफ'नं केला 'हा' लाजिरवाणा विक्रम
  3. Indian Cricket Team Diwali Celebration : भारतीय संघानं नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यापुर्वी आपल्या कुटुंबियांसोबत केली दिवाळी साजरी; पाहा व्हिडिओ
Last Updated :Nov 12, 2023, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.