ETV Bharat / sports

IPL 2022 LSG vs CSK: सीएसके पहिल्या विजयाच्या शोधात; एलएसजीसोबत आज आमनेसामने

author img

By

Published : Mar 31, 2022, 4:33 PM IST

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये गुरुवारी लखनौ आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे. लखनौ (LSG) आणि चेन्नई (CSK) या संघांनी या हंगामात प्रत्येकी एक सामना खेळला आहे. त्या सामन्यांत दोन्ही संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.

LSG vs CSK
LSG vs CSK

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील (IPL Fifteenth season ) सातवा सामना गुरुवारी बेब्रॉन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामन लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( CSK vs LSG ) संघात खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांचा सामना करणार आहेत. कारण लखनौ संघ यंदा नव्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झाला आहे. दोन्ही संघाचा हा सामना स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघाना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली होती.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स 29/4 वर झुंजताना, बदोनी (54) यांनी दीपक हुडा (55) सोबत 87 धावांची चांगली भागीदारी करून लखनौला 20 षटकात 158/6 अशी सन्माननीय धावसंख्या गाठण्यास मदत केली. भारताचा उपकर्णधार केएल राहुलच्या ( India vice-captain KL Rahul ) नेतृत्वाखालील संघाला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला असला, तरी वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यातून काही सकारात्मक गोष्टी दिसून आल्या. ज्यामध्ये बदोनी आणि हुडाची फलंदाजी आणि दुष्मंथा चमीराची गोलंदाजीचा समावेश आहे. यात सर्वात मोठा फायदा म्हणजे बदोनीची फलंदाजी, त्याने आपली खेळी उभारताना परिपक्वता काय असते, हे दाखवून दिले.

लखनौ सुपर जायंट्सप्रमाणे, चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) देखील त्यांचा पहिला सामना गमावला आहे. गुरुवारी येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आपले पहिले गुण मिळविण्याची आशा करेल. सीएसकेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. ज्यामध्ये त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांना हवी तशी कामगिरी करू शकली नाही. वानखेडेवरील सामन्यात दव जास्त असल्याने दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणे अत्यंत कठीण आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ( Lucknow Super Giants ), जडेजाला त्याचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची आशा असेल. केकेआर विरुद्ध अनुभवी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी सुरुवात केली होती, पण अत्यंत अयोग्य वेळी ते बाद झाले. सलामीवीर अपयशी ठरल्यास सीएसकेला त्यापैकी एकाद्वारे फलंदाजी करण्याची आशा असेल. त्याचबरोबर लखनौ संघाला देखील आपल्या विजयाची आशा असल्याने, कर्णधार केएल राहुलला देखील आपल्या सहकार्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बडोनी, डी चमीरा, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), के गौतम, जेसन होल्डर, दीपक हुडा, एविन लुईस, काइल मेयर्स, मोहसिन खान, शाहबाज नदीम, मनीष पांडे, अंकित राजपूत, रवी बिश्नोई, करण शर्मा, मार्कस स्टॉइनिस, अँड्र्यू टाय, मनन वोहरा आणि मयंक यादव.

चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (कर्णधार), मोईन अली, केएम आसिफ, भगत वर्मा, ड्वेन ब्राव्हो, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, एमएस धोनी, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, हरी निशांत, नारायण जगदीशन, ख्रिस जॉर्डन, अॅडम. मिल्ने, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षना आणि रॉबिन उथप्पा.

हेही वाचा - Ipl 2022 Rcb Vs Kkr: फाफ डु प्लेसिसकडून दिनेश कार्तिकचे कौतुक; शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकचा अनुभव आला कामी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.