ETV Bharat / sports

IPL 2022 RCB vs KKR: फाफ डु प्लेसिसकडून दिनेश कार्तिकचे कौतुक; शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकचा अनुभव आला कामी

author img

By

Published : Mar 31, 2022, 3:29 PM IST

आयपीएलच्या सहाव्या सामन्यात केकेआरचा तीन गडी राखून पराभव केल्यानंतर. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ( Captain Faf du Plessis ) म्हणाला की, शेवटच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकचा अनुभव त्याच्या संघासाठी उपयोगी पडला.

RCB
RCB

मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( RCB vs KKR ) संघात पार पडला. हा सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या षटकांपर्यंत गेलेल्या रोमांचक सामन्यात दिनेश कार्तिकने विजयी चौकार लगावला, ज्यामुळे कोलकातावर बंगळुरुने 3 विकेट्सने विजय ( RCB won by 3 wkts ) मिळवला. विजयानंतर बोलताना विजयी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला, शेवटच्या षटकांत दिनेश कार्तिकचा अनुभव कामी आला.

कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला, हा विजय चांगला होता. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना सकारात्मक विचारांसोबत उतरायला हवे, परंतु इतक्या शेवटपर्यंत सामना जाईला नको होता. केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. तो पुढे म्हणाला, या खेळपट्टीवर खुप सीम आणि उछाल होती. दोन तीन दिवसांपुर्वी या खेळपट्टीवर 200 विरुद्ध 200 धावसंख्या उभारली गेली होती. परंतु आज या खेळपट्टीवर 120 विरुद्ध 120. आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकायला हवे होते. मात्र विजय हा विजयच असतो. त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांने दिनेश कार्तिकचे कौतुक देखील केले. तो म्हणाला, शेवटी डीकेचा अनुभव कामी आला. तो शेवटच्या पाच षटकांत इतका शांत होता, जसा महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) असतो.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 129 धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज होती, त्यात दिनेश कार्तिकने पहिल्या दोन चेंडूंच्या मदतीने संघाला विजयापर्यंत नेले. कार्तिकने ( Dinesh Karthik ) शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार लगावला, त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या.

हेही वाचा -RCB vs KKR IPL : पहिला विजय! बंगळुरूचा कोलकातावर ३ विकेट्सने दणदणीत विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.