ETV Bharat / sports

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी धावा करताना चाचपडतोय; गौतम गंभीरने दिली मोठी प्रतिक्रिया

author img

By

Published : Sep 16, 2021, 3:43 PM IST

Chris Gayle has to open the batting: Gautam Gambhir
IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी धावा करताना चाचपडतोय; गौतम गंभीरने दिली मोठी प्रतिक्रिया

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावा करताना चाचपडताना दिसला होता. याविषयावरुन गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने पंजाब किंग्ससाठी एक सल्ला दिला आहे. त्याने, ख्रिस गेल, आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात पंजाब किंग्सकडून सलामीला उतरला पाहिजे, असे म्हटलं आहे. गंभीरला वाटतं, गेलला तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी पाठवणे हे न समजण्यापलिकडे आहे.

गौतम गंभीर म्हणाला की, ख्रिस गेलने ओपनिंग केली पाहिजे. जर गेल संघात आहेत तर तुम्ही त्याला का तिसऱ्या नंबरवर खेळवू इच्छित आहात. त्याला तिसऱ्या नंबरवर खेळवण्याचा काही अर्थच नाही. वेस्ट इंडिज आणि पंजाब किंग्सने असे केलं आहे. पण मला त्यांनी असा का केलं याची कल्पना नाही.

जर ख्रिस गेल अंतिम संघात आहे तर त्याने सलीमीवीर म्हणून फलंदाजीला यायला हवे. कारण तो चेंडू वाया घालत नाही. नंबर 3 वर सलामीच्या तुलनेत अधिक सिंगल धावा घ्यावा लागतात, असेही गौतम गंभीरने सांगितलं.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फलंदाजीत धावा करणे कठीण जात आहे. याविषयी गौतम गंभीर म्हणाला की, धोनी असा खेळाडू आहे जो चौथ्या किंवा पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरतो. पण आम्ही त्याला आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरताना पाहिलं. त्याने सॅम कुरेनला आपल्याआधी फलंदाजीला पाठवलं हे देखील आपण पाहिलं आहे. यामागे कारण आहे की, तो एक मेंटॉर आणि यष्टीरक्षकच्या भूमिकेसाठी प्रयत्न करत आहे. जो संघाचे नेतृत्व आणि यष्टीरक्षणाची करू शकेल.

महेंद्रसिंग धोनीसाठी धावा करणे कठीण होत आहे. कारण तुम्ही जेव्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोडून देता तेव्हा तुमच्यासाठी आयपीएल खूप कठीण स्पर्धा होते. आयपीएलमध्ये तुम्हाला दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागतो, असे देखील गौतम गंभीर म्हणाला.

हेही वाचा - IPL 2021 : अफगाणिस्तानच्या खेळाडूला मिळेना वीजा, सनरायझर्स हैदराबादच्या डोकेदुखीत वाढ

हेही वाचा - IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार फिरकीपटू आयपीएलमधून बाहेर, 'हा' खेळाडू घेणार जागा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.