ETV Bharat / sports

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार फिरकीपटू आयपीएलमधून बाहेर, 'हा' खेळाडू घेणार जागा

author img

By

Published : Sep 15, 2021, 9:05 PM IST

दिल्लीचा फिरकीपटू गोलंदाज मनिमारन सिद्धार्थ दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. दिल्लीने सिद्धार्थच्या जागेवर नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आलेला कुलवंत खेजरोलिया याला आपल्या मुख्य संघात घेतले आहे.

Delhi Capitals include net bowler Kulwant  Khejroliya in main squad after spinner Manimaran Siddharth sustains injury
IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार फिरकीपटू आयपीएलमधून बाहेर, 'हा' खेळाडू घेणार जागा

दुबई - आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फिरकीपटू गोलंदाज मनिमारन सिद्धार्थ दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. दिल्लीने सिद्धार्थच्या जागेवर नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आलेला कुलवंत खेजरोलिया याला आपल्या मुख्य संघात घेतले आहे. कुलवंत खेजरोलिया डावा हाताचा वेगवान गोलंदाज आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आज बुधवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात ते म्हणतात की, फिरकीपटू मनिमारन सिद्धार्थ दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएल 2021 मध्ये खेळणार नाही. त्याला दुबईत सराव सत्रात दरम्यान दुखापत झाली.

वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलिया याचा दिल्ली संघात नेट गोलंदाज म्हणून समावेश होता. तो दिल्ली कॅपिटल्सच्या बायो बबलमध्ये होता. त्यामुळे दिल्ली संघाने त्याला आपल्या मुख्य संघात सामिल करून घेतले आहे.

श्रेयस अय्यरला पहिल्या सत्राआधी दुखापत झाली होती. यामुळे तो पहिले सत्र खेळू शकला नव्हता. आता तो दुखपतीतून सावरला असून दुसऱ्या सत्रात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. ते 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आणखी ते 6 सामने खेळणार आहेत. सद्या ते प्ले ऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.

हेही वाचा - '2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसारखी कामगिरी करून टी-20 विश्वकरंडकमध्ये भारताला नमवू'

हेही वाचा - IPL 2021 : धोक्याची घंटा! ए बी डिव्हिलियर्सचे आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच वादळी शतक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.