ETV Bharat / sports

IPL 2021 : अफगाणिस्तानच्या खेळाडूला मिळेना वीजा, सनरायझर्स हैदराबादच्या डोकेदुखीत वाढ

author img

By

Published : Sep 15, 2021, 10:11 PM IST

आयपीएल 2021 च्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. परंतु अद्याप सनरायझर्स हैदराबादचा अफगाणिस्तानी फिरकीपटू मुजीब उर रहमानला अद्याप वीजा मिळालेला नाही. यामुळे तो कधी संघासोबत जोडला जाणार आहे अद्याप निश्चित नाही.

ipl-2021-mujeeb-ur-rahman-has-not-yet-received-visa-for-entry-in-uae
IPL 2021 : अफगाणिस्तानच्या खेळाडूला मिळेना वीजा, सनरायझर्स हैदराबादच्या डोकेदुखीत वाढ

दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. हैदराबादचा स्टार फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान, वीजाच्या अडचणीमुळे आतापर्यंत संघासोबत जोडला गेलेला नाही. पण हैदराबादचे राशिद खान आणि मोहम्मद नबी हे दुबईत दाखल होत क्वारंटाइन झालेले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजीब उर रहमान याच्या वीजासंदर्भात काम केले जात आहे. पण मुजीब संघासोबत कधी जोडला जाईल हे अद्याप सांगता येत नाही.

दरम्यान, हैदराबादचा संघ आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात 22 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंसाठी थोडीशी सवलत देण्यात आली आहे. त्या खेळाडूंना 6 दिवसांच्या ऐवजी दोन दिवसांचा क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आला आहे. यात त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंना बायो बबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला दुखापत

आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फिरकीपटू गोलंदाज मनिमारन सिद्धार्थ दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. दिल्लीने सिद्धार्थच्या जागेवर नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आलेला कुलवंत खेजरोलिया याला आपल्या मुख्य संघात घेतले आहे. कुलवंत खेजरोलिया डावा हाताचा वेगवान गोलंदाज आहे.

हेही वाचा - IPL 2021 : धोक्याची घंटा! ए बी डिव्हिलियर्सचे आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच वादळी शतक

हेही वाचा -IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, स्टार फिरकीपटू आयपीएलमधून बाहेर, 'हा' खेळाडू घेणार जागा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.