ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विराट कोहलीनं ठोकले 48 वे वनडे शतक! केएल राहुलनं 'अशी' बजाविली महत्त्वाची भूमिका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 7:09 AM IST

Updated : Oct 20, 2023, 9:31 AM IST

Cricket World Cup 2023 : विराट कोहलीच्या यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या शतकासाठी केएल राहुलचे मोठे योगदान विसरता येणार नाही. वाचा, यावरील मिनाक्षी राव यांचा लेख.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

पुणे Cricket World Cup 2023 : विराट कोहलीनं गुरुवारी पुण्यात 48 वे एकदिवसीय शतक आणि यंदाच्या विश्वचषकातील पहिलं शतक झळकाविलं. त्यासाठी विराट हा केएल राहुलचे आभार मानणार आहे. कोहलीला स्ट्राईक न देणं, एकही धाव न घेणे आणि कोहलीला शतक झळकावण्यास मदत करणं यातून राहुलचा उदार स्वभाव होता. विश्वचषकातील रोहित शर्माच्या संघातील सांघिक भावनामुळे विराटच्या स्वप्नातील धावसंख्येला चालना देणारं सकारात्मक वातावरण होतं.

कोहलीला शतक झळकानण्याची विनंती : बांगलादेशविरुद्धच्या विजयात योगदान देण्यासाठी पुण्यातील मैदानावर राहुल वेगवान धावा करत होता. जेव्हा 38व्या षटकात कोहलीच्या 80 धावा केल्या होत्या. त्याला शतक समोर दिसंत होतं. तेव्हा तो नजरेसमोर पाहू लागला. सामना जिंकण्यासाठी भारताच्या अवघ्या 25 धावा शिल्लक असताना, राहुल कोहलीकडे गेला. त्यानं वैयक्तिक रेकॉर्डचा विचार न करता कोहलीला शतक झळकावण्याची विनंती केली. कोहलीनं राहुलची ही विनंती मान्य भारताला फक्त दोन धावांची गरज असताना एका भव्य षटकारासह शतक झळकावलं.

दुखापतीनंतर राहुल स्टार परफॉर्मर : सामन्यानंतर राहुल म्हणाला, मी त्याला (कोहलीला) सांगितलं की आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळे त्यानं एक शतक मारलं पाहिजे. चेन्नई येथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या सलामीच्या सामन्यात, सुरुवातीच्या षटकांमध्ये पहिले तीन फलंदाज शुन्यावर बाद झाल्यानंतर राहुलवर दडपण आलं होतं. त्यानंतर कोहली आणि राहुल यांनी 15 षटकं बाकी असताना ऑस्ट्रेलियन संघाच्या 199 धावांचा पाठलाग केला होता, ज्याला चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय म्हटले गेले. दुखापतीनंतर राहुल संघात परतला तेव्हापासून तो एक स्टार परफॉर्मर आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 IND Vs BAN : भारतानं उडवला बांगलादेशचा धुव्वा, कोहलीनं केला नवा विक्रम
  2. World Cup 2023 : दुखापतींमुळं पाकिस्तान संघाची चिंता वाढली, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सान्यात पाकिस्तान संघाचा काय आहे जुगाड?
  3. Cricket World Cup २०२३ IND vs BAN : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या मैदानाबाहेर; विराट कोहलीनं पूर्ण केलं षटक
Last Updated : Oct 20, 2023, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.