ETV Bharat / sports

World Cup 2023 : दुखापतींमुळं पाकिस्तान संघाची चिंता वाढली, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सान्यात पाकिस्तान संघाचा काय आहे जुगाड?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 8:18 PM IST

World Cup 2023
World Cup 2023

World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दुहेरी धक्का बसला आहे. कारण फखर जमान गुडघ्याच्या दुखापतीमुळं खेळाला मुकणार आहे. तसंच तापानं ग्रासल्याने सलमान आगाही हा सामना खेळू शकणार नाहीय.

बेंगळुरू (कर्नाटक) World Cup 2023 : शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार्‍या ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय विश्वचषक 2023 सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फखर जमान गुडघ्याच्या दुखापतीमुळं या सामन्यात खेळू शकनार नाही. तसंच फखर जमान पुढील आठवड्यापर्यंत बरा होण्याची अपेक्षा आहे. फखर जमान नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून संघाबाहेर आहे.

पाकिस्तानला दुहेरी धक्का : सध्याच्या विश्वचषकात फखर जमान, सलमान आगा यांची बरी शक्यता पाकिस्तानचा संघ वाट पाहत आहे. शुक्रवारी होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोघे सामन्याबाहेर असण्यार आहे. पाकिस्ताननं स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये नेदरलँड्स, श्रीलंकेचा पराभव केला होता. परंतु कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी, पाकिस्तानला दोन खेळाडूमुळं मोठा घक्का बसलाय. गुडघ्याच्या दुखापतीमुळं फखर जमान, तसंच तापानं सलमान आगा त्रस्त आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूची कामगिरी चांगली : "फखर जमानवर गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार केले जात आहेत, तो पुढील आठवड्यात बरा होण्याची अपेक्षा आहे," असं पाकिस्तानं अधिकृत निवेदनात सांगितलं."सलमान अली आगाला गेल्या दिवसाच्या (बुधवार) सराव सत्रानंतर ताप आला होता. तो त्यातून त्याची तबियत सुधारत आहे. तसंच संघातील इतर सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत," असं निवेदनात म्हटलं आहे.

फखर जमान एकच सामना खेळला : फखर जमान आतापर्यंत फक्त एकच सामना खेळता आला आहे. हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाकिस्तानच्या सलामीच्या सामन्यात त्यानं 12 धावा केल्या होत्या. यानंतर त्याच्या जागी अब्दुल्ला शफीकला संघात घेण्यात आलं. त्यानं श्रीलंकेविरुद्ध 113 तसंच भारताविरुद्ध 20 धावा केल्या होत्या.

गेल्या सामन्यात दोघेही संघाचा भाग नव्हते : फखर जमान तसंच आगा सलमान हे दोघेही भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. सलामीवीर फखर जमानच्या जागी अब्दुल्ला शफीक दिसला होता. आगा सलमानला अद्याप विश्वचषकातील एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही.

पाकिस्ताननं 3 पैकी 2 सामने जिंकले : पाकिस्तान संघानं आतापर्यंत विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड्सचा 81 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 6 विकेटनं पराभव केला होता. मात्र, त्यानंतर तिसऱ्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध 7 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, आगा सलमान, फखर जमान, उसामा मीर, मोहम्मद वसीम ज्युनियर

हेही वाचा -

Cricket World Cup २०२३ IND vs BAN : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या मैदानाबाहेर; विराट कोहलीनं पूर्ण केलं षटक

Mushfiqur Rahim Father : भारत-बांगलादेश सामन्याबद्दल मुशफिकूर रहीमच्या वडिलांची EXCLUSIVE मुलाखत; म्हणाले...

Cricket World Cup 2023 IND Vs BAN : भारतासमोर विजयासाठी 257 धावांचं टार्गेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.