ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय, भारताशी अंतिम सामन्यात गाठ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 1:43 PM IST

Updated : Nov 16, 2023, 10:15 PM IST

Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal : विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. हा सामना ३ गडी राखून ऑस्ट्रेलियानं जिंकला आहे. त्यामुळे अंतमि लढत भारत-ऑस्ट्रेलियात होणा हे निश्चित झालं आहे.

Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal
Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal

कोलकाता Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal : कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेला उपांत्य सामन्यात हरवलं आहे. तीन गडी राखून हा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या डावाला सावध सुरुवात झाली. हेड आणि वॉर्नर धावपट्टीवर होते. त्यांनी सावध सुरुवात केली. मात्र वार्नरचा पहिला बळी गेला. तो २९ धावा काढून तंबूत परतला. त्याला एडन मार्करामनं बाद केलं. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही सुरुवातीलाच गळती सुरू झाल्याचं दिसून आलं. वार्नरनंतर मार्श लगेच तंबूत परतला. त्यानं भोपळाही फोडला नाही. मार्श रबाडाच्या चेंडूवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियानं १०० धावांचा टप्पा पूर्ण केला. १३ षटकांमध्ये हा टप्पा पूर्ण झाला. यानंतर चौथी विकेटही गेली. मार्नसची विकेट गेली. तो १८ धावा काढून पायचित झाला. मार्नस नंतर मॅक्सवेलचीही लगेच विकेट गेली. केवळ १ धाव काढून तो तंबूत परतला. यानंतर आणखी एक विकेट पडली ती स्टीव्ह स्मिथची. तो ३० धावा काढून बाद झाला. त्यानंतर जोस इंग्लिसही बाद झाला. विजयासाठी फक्त २० धावा बाकी असताना कांगारुंचे ७ गडी तंबूत परतले होते. १० षटकं बाकी असताना अशी परिस्थिती होती. त्यामुळे सामन्यातील उत्सुकता वाढली होती. शेवटी ऑस्ट्रेलियानं बाजी मारली. ३ गडी राखून हा दुसरा उपांत्य सामना त्यांनी जिंकला. आता अंतिम सामन्यात त्यांची गाठ सामन्यात भारताशी आहे.

तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढं फक्त २१३ धावांचं ठेवलंय. आफ्रिकेचा ४९.४ षटकात २१२ धावा झाल्या. मिलर आणि क्लासेन यांचीच आज बॅट तळपल्याचं दिसलं. मिलरनं १०१ धावा केल्या. तर क्लासेननं ४७ धावांची मजल मारली. इतर खेळाडू २० धावांच्या आतच बाद झाले. कर्णधार टेंबा बावुमा तर भोपळाही फोडू शकला नाही.

नाणेफेकीचा कौल साऊथ आप्रिकेनं जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्मय कर्णधार टेंबा बावुमानं घेतला. पण अतिशय खराब सुरवात आफ्रिकन फलंदाजांची झाली. क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या सलामी जोडीनं संघाला निराश केलं. कर्णधार टेंबा बावुमाला त्याचं खातंही खोलता आलं नाही आणि तो मिशेल स्र्चच्या गोलंदाजीवर जोश इंगलिसच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. त्या पाठोपाठ क्विंटन डी कॉकही केवळ 3 धावावर बाद झाला. सुरूवातीलाच हे दोन झटके बसल्यानंतर आफ्रिकेच्या तंबूत भीतीचं वातावरण निर्माण करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं. रासी वान डेर डुसेननं केवळ सहा धावावरच मान टाकली आणि एडन मार्कराम 10 धावा असताना माघारी परतला. अशा प्रकारे 14 ओव्हरनंतर 4 बाद 44 धावा आफ्रिकेनं बनवल्या आहेत. मिशेल स्टार्च आणि जोश हेजलवूडनं पर्त्येकी 2 गडी बाद केले.

कोलकाता Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं चमकदार कामगिरी केलीय. पण आज या मोठ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं सोपं नसेल. पाचवेळा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया सहाव्या विजेतेपदाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकू पाहणार आहे. त्याचवेळी, त्यांच्यावरील चोकर्सचं ( दक्षिण आफ्रिका) ओझं दूर करण्यासाठी दक्षिण आफ्रिका आज मैदानात उतरणार आहेत.

चुरशीच्या सामन्याची अपेक्षा : विश्वचषक 2023 मध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे. पण हे करणं अजिबात सोपं नाही, कारण समोर कांगारूंचा संघ आहे, ज्याला मोठ्या सामन्यांचा संघ म्हणतात. मोठ्या सामन्यांमध्ये या संघाच्या प्रत्येक खेळाडूची दमदार कामगिरी होते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळं आज त्यांच्यात चुरशीचा सामना अपेक्षित आहे.

  • या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), टेंबा बावुमा (कर्णधार), रासी वान डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यॉन्सेन, गॅराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कगीसो रबाडा, तबरेज शम्सी
  • ऑस्ट्रलिया : डेविड वार्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, जोश इंगलिस (यष्टिरक्षक), मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), एडम झम्पा आणि जोश हेजलवूड

दोन्ही संघांचा विश्वचषकातील सामन्यांचा इतिहास काय : ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सहा वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठलीय. त्यात पाच वेळा विजय मिळवला आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडं 1992 ते 2023 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं पाचव्यांदा अंतिम चारमध्ये प्रवेश केलाय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 1999 च्या विश्वचषकात ते पहिल्यांदा एकमेकांसमोर आले होते. तो सामना बरोबरीत सुटला होता. पण सुपर सिक्सच्या टप्प्यातील चांगल्या नेट रनरेटमुळं ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरी गाठली होती.

  • हेड टू हेड आकडेवारी : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी तीन विजय नोंदवले आहेत तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 109 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेनं 55 तर ऑस्ट्रेलियानं 50 सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत झाले असून एक सामना अनिर्णित राहिलाय.

हेही वाचा :

  1. Anushka Sharma Showers Praises Virat Kohli : 'विराट' पराक्रमानंतर अनुष्काची खास पोस्ट, पतीचं केलं भरभरून कौतुक
  2. IND vs NZ Semifinal Records : वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं 'बुलेट ट्रेन'च्या वेगानं मोडले 'हे' विक्रम, आता वर्ल्ड कप राहणार लक्ष्य
  3. Cricket World Cup 2023 AUS vs SA Semifinal : ऑस्ट्रलिया की दक्षिण आफ्रिका? दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोलकाताच्या 'ईडन'वर कोणाचं 'दिल' होणार 'गार्डन'
Last Updated : Nov 16, 2023, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.