मुंबई IND vs NZ Semifinal Records : बुधवारी मुंबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 गडी गमावून 397 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकांत 327 धावांत गडगडला. यासह भारतानं न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत आयसीसी विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलाय. या सामन्यात कोहलीनं सचिनच्या शतकांचा विक्रम मोडीत काढला. तर शामीनं भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. याशिवाय या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले आहेत.
- भारतानं इतिहासात प्रथमच सलग 10 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. यापुर्वी 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघानं सलग 9 सामने जिंकले होते.
- एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात एकाच हंगामात 10 सामने जिंकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय. यापुर्वी 2003 च्या विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 9 सामने दिंकले होते.
- कपिल देव (1983), सौरव गांगुली (2003) आणि एमएस धोनी (2011) यांच्यानंतर रोहित शर्मा रोहित शर्मा हा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा चौथा भारतीय कर्णधार ठरलाय.
-
Best ever figures for an India bowler in ODIs 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📺 Highlights: https://t.co/yDhdDHzKMT#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/YXyb90fa8f
">Best ever figures for an India bowler in ODIs 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023
📺 Highlights: https://t.co/yDhdDHzKMT#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/YXyb90fa8fBest ever figures for an India bowler in ODIs 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023
📺 Highlights: https://t.co/yDhdDHzKMT#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/YXyb90fa8f
- एकदिवसीय सामन्यात सात विकेट घेणारा शामी पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. तसंच शामीचे 7/57 चे आकडे हे एकदिवसीय आणि एकदिवसीय विश्वचषकातील भारतीयांचं सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. यापुर्वी स्टुअर्ट बिन्नी यानं भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. त्यानं बांगलादेश विरुद्ध 4 धावा देत 6 गडी बाद केले होते. शामीनं कालच्या सामन्यात हा विक्रम मोडलाय.
- एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात शामी हा सर्वात वेगवान 50 बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. तसंच एकदिवसीय विश्वचषकात 50 बळी घेणारा मोहम्मद शामी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
- एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात चार वेळा पाच बळी घेणारा शामी पहिला गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कनं तीन वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केलीय.
- शामीनं एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात भारतासाठी सर्वाधिक बळी घेतले आहेत. यापुर्वी भारताचा डावखूरा वेगवान गोलंदाज जहीर खान यानं 2011 च्या विश्वचषकात 21 बळी घेतले होते.
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 50 शतकं झळकावणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यानं सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विश्वविक्रम मोडलाय.
- कोहलीनं एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा तेंडुलकरचा विक्रमही मोडला. सचिननं 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या आणि कोहलीनं 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील 10 सामन्यांमध्ये 711 धावा केल्या आहेत.
-
Virat Kohli lights up the biggest stage with a record 50th ODI century 👊#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/z1Glnd37vk
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Virat Kohli lights up the biggest stage with a record 50th ODI century 👊#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/z1Glnd37vk
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023Virat Kohli lights up the biggest stage with a record 50th ODI century 👊#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/z1Glnd37vk
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023
- एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात 700 हून अधिक धावा करणारा विराट हा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरलाय.
- कोहली ऑस्ट्रेलीयाच्या रिकी पाँटिंगला मागं टाकत एकदिवसीय इतिहासातील तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय. त्यानं 291 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13,794 धावा केल्या आहेत, तर पाँटिंगनं 375 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13,704 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर याच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
- एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर झालाय. त्यानं 27 सामन्यांमध्ये 50 षटकार मारले आहेत. यापुर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्यानं 49 षटकार मारले होते.
- न्युझीलंड विरुद्धच्या कालच्या सामन्यात श्रेयस अय्यरनं शतक केल. यंदाच्या विश्वचषकात त्याचं हे सलग दुसरं शतक होत. यासह तो राहुल द्रविड (1999) आणि रोहित शर्मा (2019) यांच्यानंतर एकदिवसीय विश्वचषकात पाठोपाठ शतकं ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय.
- श्रेयस अय्यरच्या नावावर आता भारतासाठी एकदिवसीय विश्वचषकात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम झालाय. पहिल्या उपांत्य सामन्यात अय्यरनं मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध आठ षटकार ठोकले.
- मुंबईत बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध भारतानं 4 बाद 397 धावा केल्या. आयसीसी नॉकआऊट सामन्यातील कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
- रविवारी अंतिम सामना : भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी रविवारी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईलं.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं न्यूझीलंडला लोळवलं, शामीच्या भेदक माऱ्यासमोर किवीजची शरणागती; अंतिम फेरीत धडक
- Virat Kohli : विराट कोहलीची शतकांची 'हाफ सेंच्यूरी', सचिनचा रेकॉर्ड मोडला
- Sachin Tendulkar : 'मी पाहिलेला तरुण मुलगा आता 'विराट' खेळाडू बनला', कोहलीच्या विक्रमानंतर क्रिकेटच्या 'देवा'ची प्रतिक्रिया