ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं केला आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम, अवघ्या ८३ धावांत गुंडाळलं!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 1:40 PM IST

Updated : Nov 5, 2023, 8:51 PM IST

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात भारतानं द. आफ्रिकेचा २४३ धावांनी दणदणीत पराभव केला. भारतानं दिलेल्या ३२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची टीम २७.१ षटकांत ८३ धावांवर ऑलआऊट झाली. १२१ चेंडूत १०१ धावा करणारा विराट कोहली सामनावीर ठरला.

Cricket World Cup 2023 IND vs SA
Cricket World Cup 2023 IND vs SA

कोलकाता Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ३७ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतानं द. आफ्रिकेवर २४३ धावांनी मोठा विजय मिळवला.

विराट कोहलीचं शतक : भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं दमदार सुरुवात केली. तो २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानं त्याच्या वनडे कारकिर्दीतील ४९वे शतक ठोकलं. तो १२१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. त्याला दुसऱ्या टोकावरून श्रेयस अय्यरनं उत्तम साथ दिली. तो ८७ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकात रविंद्र जडेजानं तुफान फटकेबाजी करत १५ चेंडूत २९ धावा ठोकल्या. अशाप्रकारे प्रथम फलंदाजी करताना भारतानं ५० षटकांत ३२६-५ धावांचा डोंगर रचला.

जडेजाचे ५ बळी : भारतानं दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला सुरुवातीपासूनच लागोपाठ झटके बसत राहिले. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा डी कॉक केवळ ५ धावा करून बाद झाला. कर्णधार बवुमाही केवळ ११ धावा करून परतला. द. आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेननं ३० चेंडूत सर्वाधिक १४ धावांचं योगदान दिलं. भारताकडून रविंद्र जडेजानं पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी केली. त्यानं ३३ धावा देत ५ बळी घेतले. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवनही २-२ विकेट घेतल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
  • दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 IND vs SA : विश्वचषकातील दोन बलाढ्य संघांमध्ये वर्चस्वाची लढाई; ईडन गार्डन्सवर होणार 'हाय व्होल्टेज' सामना
  2. Virat Kohli 35th Birthday : कोहलीला वाढदिवशी आज मिळणार सोन्याचा मुलामा असलेली बॅट, 'विराट' कामगिरीनं आजवर नोंदविले अनेक विक्रम
  3. Cricket World Cup 2023 : विश्वविजेत्या इंग्लंडवर मोठी नामुष्की, कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून पराभवानंतर स्पर्धेबाहेर
Last Updated : Nov 5, 2023, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.