ETV Bharat / sports

Virat Kohli 35th Birthday : कोहलीला वाढदिवशी आज मिळणार सोन्याचा मुलामा असलेली बॅट, 'विराट' कामगिरीनं आजवर नोंदविले अनेक विक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 7:51 AM IST

Virat Kohli 35th Birthday : आज भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट त्याच्या वाढदिवसानिमित्त भारतीय संघासोबत कोलकात्यात उपस्थित राहणार आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर तो दक्षिण आफ्रिकेसोबत सामना खेळणार आहे.

Virat Kohli 35th Birthday
Virat Kohli 35th Birthday

नई दिल्ली Virat Kohli 35th Birthday : विराट कोहली आपला वाढदिवस कोलकातामध्ये खास पद्धतीने साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन अनेकजण करत आहेत. आज दुपारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या इनिंग ब्रेक दरम्यान इडन गार्डन्स स्टेडियमवर विराटचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशन देणार अनोखी भेट : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) विराट कोहलीचा वाढदिवस मैदानावर साजरा करण्यास परवानगी नाकारल्यानंतर, आजच्या सामन्याचे आयोजक क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) पर्यायी तयारी करत आहेत. वाढदिवसानिमित्त कोहलीला एक अनोखी भेट दिली जाणार असल्याचं कळतं. CAB सूत्रांनी सूचित केलंय की, त्याच्या वाढदिवसाला सोन्याचा मुलामा असलेली बॅट कोहलीला दिली जाईल.

शतकांच्या बाबतीत विराट कोहली पुढे : विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 77 शतकं केली आहेत. विराटनं कसोटीत 29, वनडेत 48 आणि टी-20मध्ये 1 शतक झळकावलंय. विराट हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे. सचिननंतर रिकी पाँटिंग 71 शतकांसह तिसऱ्या स्थानावर, कुमार संगकारा 63 शतकांसह चौथ्या स्थानावर आणि जॅक कॅलिस 62 शतकांसह पाचव्या स्थानावर आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज :

  • सचिन तेंडुलकर : 100 शतकं
  • विराट कोहली : 77 शतकं
  • रिकी पोंटिंग : 71 शतकं
  • कुमार संगकारा : 63 शतकं
  • जैक कालिस : 62 शतकं

विराटच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी :

  • विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. त्यानं दिल्लीतील राजकुमार शर्मा यांच्याकडून क्रिकेटच्या टिप्स शिकल्या आहेत. 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले.
  • त्यानं 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत इटलीमध्ये लग्न केलं. त्याला एक मुलगीही आहे.
  • विराट कोहली गोलंदाजीही करू शकतो हे तुम्हाला माहीत असेलच. पण त्याने विकेटकीपिंगमध्येही हात आजमावलाय.
  • विराटनं 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. ते शतक बांगलादेशविरुद्ध झाले.
  • विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो कधीही इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) अंतिम फेरीत दिसला नाही.
  • विराट कोहलीला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, खेलरत्न आणि आयसीसी प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाले आहेत.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 IND vs SA : विश्वचषकातील दोन बलाढ्य संघांमध्ये वर्चस्वाची लढाई; ईडन गार्डन्सवर होणार 'हाय व्होल्टेज' सामना
  2. Cricket World Cup 2023 : विश्वविजेत्या इंग्लंडवर मोठी नामुष्की, कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून पराभवानंतर स्पर्धेबाहेर
  3. Cricket World Cup 2023 : दुखापतग्रस्त हार्दिकला विश्वचषकातून निरोप; हा 'प्रसिद्ध' खेळाडू घेणार जागा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.