ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 IND vs NED : भारतीय संघानं दिवाळीला फोडले 'रेकॉर्ड'चे फटाके; नेदरलॅंड्स विरुद्धच्या सामन्यात केले 'हे' विक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 8:02 AM IST

Cricket World Cup 2023 IND vs NED
Cricket World Cup 2023 IND vs NED

Cricket World Cup 2023 IND vs NED : भारतीय संघानं विश्वचषकात अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. या सामन्यात अनेक विश्वविक्रम झाले.

बंगळुरु Cricket World Cup 2023 IND vs NED : विश्वचषखाच्या अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी एकहाती पराभव केला. या विजयासह भारतानं यंदाच्या विश्वचषकात सलग नवव्या विजयाची नोंद करत एक विक्रम केला. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत न्यूझीलंडविरोधात होणार आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा हिमालय उभरला. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला. मात्र या सामन्यात भारतीय संघाकडून अनेक विक्रमांना गवसणी घालण्यात आली.

  • भारतीय संघाच्या पहिल्या पाच पैकी तिघांनी अर्धशतकं केली तर दोघांनी शतकी खेळी केली. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, कोणत्याही संघाच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी एका डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
  • नेदरलँड्सवरील विजय हा भारताचा एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील सलग नववा विजय होता. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात भारतीय संघानं सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे.
  • एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात सलग नऊ सामने जिंकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील सलग आठ विजय हे याआधीचे सर्वोत्तम होते. रोहितनं गांगूलीला मागं टाकत आता नवीन विक्रम केलाय.
  • रोहितनं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 503 धावा केल्या, ज्यामुळे त्याला सौरव गांगुलीचा एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडता आला. गांगुलीनं 2003 च्या विश्वचषकात एकूण 465 धावा केल्या होत्या.
  • रोहित शर्मानं या विश्वचषकात 503 धावा केल्या. त्यानं मागील 2019 च्या विश्वचषकातही 500 हून अधिक धावा केल्या होत्या. सलग दोन विश्वचषक स्पर्धेत 500 हून अधिक धावा करणारा रोहित विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरलाय. तसंच दोन विश्वचषक स्पर्धेत 500 हून अधिक धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर दुसरा फलंदाज ठरलाय.
  • एका कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे. त्यानं 2023 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 60 षटकार मारले आहेत. यापुर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलीयर्सच्या नावावर होता.
  • श्रेयस अय्यरनं नेदरलँड्सविरुद्ध 94 चेंडूत नाबाद 128 धावांचा तडाखा दिला. यासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेदरलँड्सविरुद्ध शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय.
  • भारतीय फलंदाज के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. विश्वचषकाच्या इतिहासातील चौथ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरलीय.
  • रवींद्र जडेजानं एका विश्वचषक स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये 16 खेळाडूंना बाद केले आहे. त्यानं भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडलाय. त्यानं 1996 च्या विश्वचषकात 15 बळी घेतले होते.
  • एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आता के एल राहुलच्या नावावर झालाय. त्यानं रविवारी नेदरलँड्सविरुद्ध 62 चेंडूत आपलं शतक पुर्ण केलं. यासोबतच त्यानं 11 ऑक्टोबर 2023 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकण्याचा आपलाच कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडलाय. तसंच विश्वचषकाच्या इतिहासात शतक ठोकणारा तो राहुल द्रविडनंतर केवळ दुसरा भारतीय यष्टिरक्षक ठरलाय.
  • भारतीय संघानं या सामन्यात 9 गोलंदाजांचा वापर केला. एखाद्या संघाच्या 9 जणांनी गोलंदाजांनी करण्याचा हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसराच प्रसंग होता. याआधी इंग्लंडच्या संघानं श्रीलंकेविरुद्ध 1987 साली पेशावर इथं झालेल्या सामन्यात 9 गोलंदाज वापरले होते. तर न्युझीलंडनं 1992 साली ख्राईस्टचर्च इथं पाकिस्तानविरुद्ध 9 गोलंदाजांचा वापर केला होता.

हेही वाचा :

  1. Cricket world cup 2023 IND vs NED : प्रेक्षकांची मागणी अन् भारतीय फलंदाज बनले गोलंदाज; दोघांनी घेतली विकेट
  2. World Cup 2023: विश्वचषक २०२३: विश्वचषकात शतक झळकावणारा केएल राहुल दुसरा भारतीय यष्टीरक्षक
  3. Cricket World Cup 2023 : टीम इंडियाकडून देशाला 'दिवाळी गिफ्ट', नेदरलॅंडचा १६० धावांनी पराभव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.