ETV Bharat / sports

२३ वर्षीय रवी बिश्नोईचा भीम पराक्रम! राशिद खानला मागे टाकून बनला जगातील नंबर १ गोलंदाज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 6:22 PM IST

Ravi Bishnoi
Ravi Bishnoi

ICC T20 Ranking : आयसीसी टी २० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम असून, आता रवी बिश्नोईनं गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं.

नवी दिल्ली ICC T20 Ranking : भारताचा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचा फायदा मिळाला आहे. आयसीसीनं बुधवारी जारी केलेल्या ताज्या टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत त्यानं पाच स्थानांनी झेप घेत अव्वल स्थान पटकावलं.

अव्वल १० मध्ये बिश्नोई एकमेव भारतीय : रवी बिश्नोईनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत ५ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या. २३ वर्षीय बिश्नोईचे ६९९ रेटिंग गुण आहेत. त्यानं अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला (६९२ गुण) अव्वल स्थानावरून दूर केलं. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा आणि इंग्लंडचा आदिल रशीद संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर असून दोघांचे ६७९ गुण आहेत. अव्वल पाच गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या महिष तिक्षा (६७७ गुण) याचाही समावेश आहे. टी २० फॉरमॅटमध्ये अव्वल १० मध्ये बिश्नोई हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. बिश्नोईशिवाय अक्षर पटेलनही क्रमवारीत ९ स्थानांनी झेप घेतली. तो १८ व्या स्थानी पोहचला आहे.

  • Ravi Bishnoi in T20i 💙

    (Age : 2️⃣3️⃣ )

    ICC Rankings : 𝟭

    Matches : 21
    Wickets : 34
    Average : 17.3
    Economy : 7.1

    This LSG 🩸 Is Here to Rule !! pic.twitter.com/DVx2RoaK1a

    — Notout* (@notoutstill) December 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम : ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तर सलामीवीर ऋतुराज गायकवाड एक स्थान घसरून सातव्या स्थानावर आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नसला तरीही हार्दिक पांड्यानं अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसरं स्थान कायम राखलं आहे.

रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसतील. अशा परिस्थितीत त्यांना आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी असेल.

हेही वाचा :

  1. आयपीएल २०२४ च्या लिलावात 'या' ५ खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
  2. ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि बहीण वैशालीनं रचला अनोखा विक्रम, विक्रमवीर जगातील पहिले भावंड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.