ETV Bharat / sports

IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव, भारताची मालिकेत 2-0 ने आघाडी

author img

By

Published : Feb 19, 2023, 10:23 AM IST

Updated : Feb 19, 2023, 2:19 PM IST

बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात मिळालेले 114 धावांचे लक्ष भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात सहजरित्या गाठले.

IND vs AUS 2nd Test
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 31.1 षटकात 113 धावांवर गुंडाळला. त्यानंतर मिळालेले 114 धावांचे लक्ष्य भारताने चार गडी गमावून पूर्ण केले. भारताने 118 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 31 आणि केएस भरतने 23 धावांची नाबाद खेळी केली.

भारताचा दुसरा डाव : केएल राहुलला दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याला नॅथन लॉयनने एका रनवर आउट केले. राहुलने तीन चेंडूंचा सामना केला. चेतेश्वर पुजाराने 31 आणि केएस भरतने 23 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने 31, विराट कोहलीने 20 आणि श्रेयस अय्यरने 12 धावांचे योगदान दिले. नॅथन लॉयनने 2 तर टॉड मर्फी आणि अ‍ॅलेक्स कॅरीने 1-1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव : भारताकडून आर अश्विनने तीन विकेट घेतल्या आहेत. अश्विनने ट्रॅव्हिस हेडला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. हेडने 46 चेंडूत 43 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. हेड पहिल्या डावात मोहम्मद शमीचा बळी ठरला होता. त्याने 30 चेंडूत 12 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला होता. हेडपाठोपाठ अश्विनने स्टीव्ह स्मिथलाही (9) स्वस्तात निपटवले. स्मिथ एलबीडब्लू बाद झाला. अश्विनने मॅट रेनशॉलाही (२) बाद केले.

जडेजाने 7 विकेट घेतल्या : रवींद्र जडेजाने डावात 7 विकेट घेतल्या. जडेजाने सामन्याच्या दुसऱ्या डावातही उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने ख्वाजाला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. ख्वाजाने 13 चेंडूत 6 धावा केल्या. ख्वाजानंतर जडेजाने मार्नस लबुशेन (35), पीटरहँड्स कोम्ब (0) आणि कर्णधार पॅट कमिन्स (0), अ‍ॅलेक्स कॅरी (7), नॅथन लिऑन (8) आणि मॅथ्यू कुहेनेमन (0) यांना बाद केले. टॉड मर्फी (3) नाबाद राहिला. आर अश्विनने तीन विकेट घेतल्या. अश्विनने ट्रॅव्हिस हेडला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. हेडने 46 चेंडूत 43 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर अश्विनने धोकादायक फलंदाज स्टीव स्मिथला एलबीडब्लू आउट केले. स्मिथ 9 धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने 125 चेंडूत 81 धावा केल्या. या खेळीदरम्यान ख्वाजाने 12 चौकार आणि 1 षटकार मारला होता. जडेजाने त्याला केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्बने 72 धावांची नाबाद खेळी केली. डेव्हिड वॉर्नर 15, मार्नस लॅबुशेन 18, स्टीव्ह स्मिथ शून्य, ट्रॅव्हिस हेड 12, अ‍ॅलेक्स कॅरी शून्य, पॅट कमिन्स 33, टॉड मर्फी शून्य, नॅथन लायन 10, मॅथ्यू कुहनेमन 6 धावा करून बाद झाले.

भारताचा पहिला डाव : सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला. अष्टपैलू अक्षर पटेलने सर्वाधिक 74 धावा केल्या. विराट कोहलीला त्याच्या घरच्या मैदानावर अर्धशतक पूर्ण करता आले नाही. कोहलीने 44 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा 32, केएल राहुल 17, चेतेश्वर पुजारा 0, श्रेयस अय्यर 4, रवींद्र जडेजा 26, केएस भरत 6, रविचंद्रन अश्विन 37, मोहम्मद शमी 2 आणि मोहम्मद सिराज 1 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा : ICC Womens T20 World Cup : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर 11 धावांनी मात

Last Updated : Feb 19, 2023, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.