ETV Bharat / sports

ICC Womens T20 World Cup : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर 11 धावांनी मात

author img

By

Published : Feb 19, 2023, 6:43 AM IST

महिला टी-20 विश्वचषकात काल इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला. टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे.

IND vs ENG
भारत विरुद्ध इंग्लंड

केपटाऊन : महिला टी-20 विश्वचषकाचा 14 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकताच भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 151 धावा केल्या आणि भारताला 152 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 140 धावाच करू शकला.

भारताविरुद्ध इंग्लंडचा सलग सहावा विजय : भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 52 आणि ऋचा घोषने 47 धावा केल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून नताली स्कायव्हरने सर्वाधिक 50 धावा केल्या. तिच्याशिवाय एमी जोन्सने 40 आणि हीदर नाइटने 28 धावांचे योगदान दिले. भारताकडून रेणुका सिंहने पाच तर शिखा पांडे आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे.

भारताचा डाव : पहिली विकेट, शेफाली वर्मा 11 चेंडूत 8 धावा. तिला लॉरेन बेलने नताली स्किव्हरच्या हाती झेलबाद केले. दुसरी विकेट, जेमिमा रॉड्रिग्ज 16 चेंडूत 13 धावा. तिला सारा ग्लेनने नताली स्किव्हरच्या हाती झेलबाद केले. तिसरी विकेट, हरमनप्रीत कौर 6 चेंडूत 4 धावा. तिला सोफी एक्लेस्टोनने अ‍ॅलिस कॅप्सीच्या हातून झेलबाद केले. चौथी विकेट, स्मृती मानधना 41 चेंडूत 52 धावा, तिला सारा ग्लेनने बाद केले. पाचवी विकेट, दीप्ती शर्मा 9 चेंडूत 7 धावा. 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ती धावबाद झाली.

इंग्लंडचा डाव : पहिली विकेट, डॅनियल यट शून्यावर बाद झाली. तिला रेणुका सिंहने रिचा घोषच्या हातून झेलबाद केले. दुसरी विकेट, अ‍ॅलिस कॅप्सी 6 चेंडूत 3 धावा. तिला रेणुका सिंहने बोल्ड केले. तिसरी विकेट, सोफिया डंकले 11 चेंडूत 10 धावा, तिला रेणुका सिंहने बोल्ड केले. चौथी विकेट, हीथर नाइट 23 चेंडूत 28 धावा. तिला शिखा पांडेने शेफाली वर्माच्या हातून झेलबाद केले. पाचवी विकेट, नताली स्कीव्हर 42 चेंडूत 50 धावा. तिला दीप्ती शर्माने स्मृती मानधनाकडून झेलबाद केले. सहावी विकेट, एमी जोन्स 27 चेंडूत 40 धावा. तिला रेणुका सिंहने रिचा घोषच्या हातून झेलबाद केले. सातवी विकेट, कॅथरीन स्क्रिव्हर शून्यावर बाद. तिला रेणुका सिंहने राधा यादवच्या हातून झेलबाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 : भारत - शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ; इंग्लंड - सोफिया डंकले, डॅनिएल येट, अ‍ॅलिस कॅप्सी, नताली सायव्हर, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), कॅथरीन सायव्हर, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.

हेही वाचा : Celebrity Cricket League 2023 : 'हे' आहे सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे वेळापत्रक; जाणून घ्या कुठे होणार कोणते सामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.