ETV Bharat / sitara

सफाई कर्मचाऱ्यांच्या ‘दैवी’ कर्माला तेजस्विनीचा पंडितचा दंडवत

author img

By

Published : Oct 19, 2020, 3:34 PM IST

Tejaswni Pandit Navaratri special photo shoot
‘दैवी’ कर्माला तेजस्विनीचा पंडितचा दंडवत

नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित देवीच्या वेगवेगळ्या रुपातील फोटो लोकांसमोर ठेवत असते. यंदाचेही तिचे फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. पहिल्यादिवशी कोरोना योध्यामध्ये सर्वात आघाडीवर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या रुपातील देवीची प्रतिमा तिने सादर केली होती. दुसऱ्या दिवशी तिने पोलिसांमधील रणरागिणीचे रुप दाखवले तर तिसऱ्या दिवशी सफाई कामागारांच्या रुपातील देवी आपल्यासमोर सादर केली आहे.

मुंबई - आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. यंदा ती कोरोनायोद्ध्यांना आपल्या फोटो Illustration मधून ट्रिब्यूट देत आहे. तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांना आणि दूसऱ्या दिवशी पोलिसांना आदरांजली वाहिल्यावर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली आहे.

Tejaswni Pandit Navaratri special photo shoot
सफाई कामागारांच्या रुपातील देवी

हातात झाडू घेऊन रस्त्यावर उभी ठाकेलेली रणरागिणी आपल्या फोटोमधून तेजस्विनीने साकारलीय. तेजस्विनी पंडित तिस-या दिवशीच्या फोटोशूटविषयी सांगते, “दुर्गामातेने आपल्या शक्तीशाली त्रिशुळाने असुराचा वध केला होता. कोरोनारूपी असूराला पळवून लावायचे असेल, तर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन महत्वाचेच ना.. कोरोना काळात स्वच्छता कर्मचा-यांच्या हातातल्या मोठ्या झाडुने ही त्रिशुळाचेच तर काम केले होते. त्यांच्यातल्या त्या दैवी कर्मांमूळेच तर आपण प्रत्येक गल्ली-बोळात, गावात, पाड्यात, शहरात स्वच्छता पाहू शकतोय.”

Tejaswni Pandit Navaratri special photo shoot
कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला तेजस्विनीचा सलाम

तेजस्विनी पंडित पुढे म्हणते, “आपण लहानपणापासून ऐकलंय, जिथे स्वच्छता असेल. तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि वर्षाचे 365 दिवस दारोदारी स्वच्छता करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात. त्यांच्यातल्या दैवीरूपाला माझे या फोटोशूटव्दारे नमन.”

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते. सध्या कोरोनायोद्ध्यांना ती वाहत असलेली आदरांजली रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे.

Tejaswni Pandit Navaratri special photo shoot
पोलिसांमधल्या ‘दैवत्वा’ला तेजस्विनीचा सलाम

पोलिसांमधल्या ‘दैवत्वा’ला सॅल्यूट करणारं अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नवरात्री स्पेशल फोटोशूट

अभिनेत्री तेजस्विनी पंडित यंदा आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना आदरांजली देत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने डॉक्टरांमधल्या ‘दैवी’ भावनेला आदरांजली दिल्यावर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कोरोना काळात केलेल्या अभूतपूर्व योगदानाला आदरांजली दिली होती.

कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला नवरात्री फोटोशूटव्दारे तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट !!

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो. दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घातलेली रूग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.