दोन मुस्लीम देशांमध्ये युद्ध होणार? इराण अन् पाकिस्तानमधील संबंध या टोकापर्यंत कसे पोहचले?

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 17, 2024, 5:01 PM IST

Pakistan Iran Conflict

Pakistan Iran Conflict : पाकिस्तान आणि इराण, आशियातील दोन मुस्लिमबहुल देश, ज्यांचे संबंध मैत्रीपूर्ण तर होते. परंतु ते कधीच घनिष्ट मित्र नव्हते. 1947 मध्ये पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, या दोन देशांमधील संबंध ऐतिहासिक, भौगोलिक, आर्थिक आणि धार्मिक मुद्द्यांमुळे प्रभावित झाले. वाचा पाकिस्तान आणि इराणमधील बिगडलेल्या संबंधांचा आढावा घेणारा हा विशेष अहवाल.

हैदराबाद Pakistan Iran Conflict : इराणच्या सरकारी मीडियानुसार, इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) पाकिस्तानमधील जिहादी गटावर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ला केला. गाझामधील पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धादरम्यान इराणनं पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्यानं संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची नवी परिस्थिती उत्पन्न झाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केलाय. इराणनं 'कोणत्याही कारणाशिवाय' पाकिस्तानी हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचं मंत्रालयानं म्हटलं. या हल्ल्यात दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाल्याचं पाकिस्तानं सांगितलं आहे.

  • "The strike inside Pakistani territory (by Iran) resulted in the death of two innocent children...It is concerning that this illegal act has taken place despite the existence of several channels of communication between Pakistan and Iran"

    - #Pakistan's Foreign Affairs Ministry… pic.twitter.com/Nyt8KMzGi4

    — Asian Politico (@AsianPolitico) January 17, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इराणनं हल्ला का केला : आपल्या काही अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं सोमवारी सीरिया आणि इराकमधील दहशतवादी तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. गाझा युद्धाला प्रत्युत्तर म्हणून, इराण इस्राईल आणि अमेरिकेशी अप्रत्यक्ष संघर्ष करत आहे. मात्र इराणचं म्हणणं आहे की ते आपल्या प्रादेशिक मित्र देशांविरुद्धच्या हल्ल्यांपासून आणि देशांतर्गत संघर्षापासून स्वतःचा बचाव करत आहेत. या महिन्यात, इराणच्या केरमन शहरात इस्लामिक स्टेट गटाच्या शाखेनं केलेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 100 लोक मारले गेले होते.

  • Fury as Iran strikes Pakistan killing two children: Pakistani government blasts 'unprovoked violation' with Iranian state TV saying raids hit Sunni militant bases - before later withdrawing claimhttps://t.co/72E2mALEnH via @MailOnline

    — Frankie Crisostomo (@FrancCrist) January 17, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तान, इराण आणि सौदी अरेबिया : पाकिस्तान आणि इराणमधील सामायिक सुरक्षा चिंता दोन्ही देशांमधील तणावाला कारणीभूत आहे. दोन्ही देश दहशतवाद आणि अतिरेक्यांशी लढण्यात स्वारस्य दाखवतात, पण त्यांनाही मर्यादा आहेत. पाकिस्तान हा सुन्नी बहुसंख्य देश आहे तर इराणमध्ये शिया मुस्लिमांची संख्या जास्त आहे. तथापि, गेल्या 70 वर्षांत, पाकिस्तान आणि इराणमध्ये वाणिज्य, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तसंच प्रादेशिक स्थैर्यासाठी अनेक प्रयत्न झालेत. मात्र इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संघर्षामुळे हे संबंध कधीच फुलले नाहीत. पाकिस्तान हा बहुतांशी सौदी अरेबियाच्या राजनैतिक प्रभावाखाली असतो हे सर्वज्ञात आहे.

अमेरिकेचा प्रभाव : इराण आणि सौदी अरेबियामध्ये या प्रदेशातील प्रभावावरून संघर्ष सुरू झाला. याव्यतिरिक्त, दोन देशांमध्ये लक्षणीय धार्मिक फरक आहेत. ज्यामुळे कधीकधी संघर्ष टोकाल पोहोचतो. याचा फटका पाकिस्तानलाही बसला आहे. पाकिस्तान आणि इराणमधील संबंध आणखी एका मोठ्या जागतिक शक्तीच्या निर्णयामुळे प्रभावित झाले, ती म्हणजे अमेरिका.

इराण आण्विक करार : उदाहरण म्हणून, तुम्ही संयुक्त व्यापक कृती योजना (JCPOA) घेऊ शकता, ज्याला इराण आण्विक करार देखील म्हणतात. इराण आण्विक करार हा इराण आणि P5+1 (युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य—युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, रशिया, फ्रान्स आणि चीन अधिक जर्मनी) यांच्यात जुलै 2015 मध्ये झालेला करार आहे. आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात इराणचा आण्विक कार्यक्रम मर्यादित करून अण्वस्त्रं विकसित करण्यापासून रोखण्यासाठी हा करार करण्यात आला होता. मात्र 2018 मध्ये अमेरिकेने या करारातून एकतर्फी माघार घेतली. यामुळे इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव वाढला असून त्याचा पाकिस्तान-इराण संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. कारण पाकिस्तान आपल्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे.

शब्द आणि कृतीमध्ये फरक : खरे तर शब्द आणि कृतीमधील फरक ही दोन्ही देशांमधील संबंधांची मोठी अडचण आहे. पत्रकार परिषदा आणि राजनयिक विधानांमध्ये, पाकिस्तान आणि इराण दहशतवाद, कट्टरतावाद आणि अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीबद्दल समान चिंता व्यक्त करतात. मात्र, जेव्हा जेव्हा या सुरक्षा समस्यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान समन्वय आणि गुप्तचर सामायिकरणाचा विषय येतो, तेव्हा दोन्ही देश एकमेकांसाठी फारसं काही करत असल्याचं दिसत नाहीत.

पाकिस्तान-इराण संबंध गुंतागुंतीचे : अलीकडच्या काळात जागतिक राजकीय बदल पाहता पाकिस्तान आणि इराणमधील संबंध अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत. गाझामध्ये इस्रायल-पॅलेस्टाईनच्या नव्या युद्धामुळे पश्चिम आशियात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इराणसमोरील आव्हानं वाढली आहेत. विशेषत: अमेरिका आणि इराणमधील संबंध ऐतिहासिक तणावाच्या स्थितीत पोहोचले आहेत. दुसरीकडे, आर्थिक समस्यांशी झुंजत असलेल्या पाकिस्तानला अमेरिका आणि सौदी अरेबियाशी संबंध राखणं भाग आहे. एकूणच आपण असे म्हणू शकतो की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पाकिस्तानची स्थिती दोन बोटींवर पाय ठेवून विरुद्ध दिशेनं प्रवास करणाऱ्या व्यक्तीसारखी आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अंतर्गत भागात सरकार आणि जनता यांच्यातील वाढत्या अंतर आणि तणावाच्या रूपातही दिसून येतो.

सौदी अरेबिया पाकिस्तानचा मित्र : 2023 मध्ये इराण, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील त्रिकोणी चर्चेमुळे तणाव कमी होण्यास वाव असल्याचं दिसून आलं. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत. तर इराण सौदी अरेबियाला या भागातील शत्रू मानतो. तिन्ही देशांमधील चर्चा आणि चांगले संबंध पूर्ववत झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला असता. कारण यामुळे पाकिस्तान इराणवर नाराज न होता सौदी अरेबियाशी घनिष्ठ संबंध ठेवू शकला असता.

तालिबानची भूमिका : मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारशी इराणचे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. दहशतवाद्यांची सीमेपलीकडून होणारी हालचाल, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अवैध स्थलांतरितांच्या प्रवेशामुळे इराणला अडचणींचा सामना करावा लागला. तर पाकिस्तान सध्या तालिबानशी शत्रुत्व करण्याच्या स्थितीत नाही. अफगाणिस्तानच्या बाबतीत पाकिस्तान आणि इराण यांच्या दृष्टिकोनातील फरकाचाही त्यांच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. किंबहुना, स्पष्टपणे सांगायचं तर ते अधिकाधिक तणावपूर्ण बनलं आहे.

तालिबानमुळे इराणच्या अडचणी वाढल्या : गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी सैन्य आणि सरकारनं तालिबानला मदत केली हे आता गुपित नाही. अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्ताननं तालिबानला मदत तर केलीच, शिवाय पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानचा ताबा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारच्या अस्तित्वामुळे इराणच्या अंतर्गत अडचणी वाढल्या. इराणला तालिबानमुळे ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, बेकायदेशीर स्थलांतरितांचा सीमेवर प्रवेश, इराणमधील दहशतवादी घटनांमध्ये वाढ या समस्या भेडसावत आहेत. आता पाकिस्तानची समस्या अशी आहे की तो ना तालिबानला छेडू शकतो ना इराणला सोडू शकतो. मात्र, वेळोवेळी या मुद्द्यांवर पाकिस्तान आणि इराण यांच्यात चर्चा झाली असून, त्यातून काही विशेष निष्पन्न झालं नाही.

बलुचिस्तानचा प्रभाव : बलुचिस्तानच्या स्थितीचा पाकिस्तान आणि इराणमधील संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. बलुचिस्तानच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सुन्नी दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी इराण अनेकदा पाकिस्तानकडे करत आहे. या भागात अनेक अतिरेकी आणि फुटीरतावादी गटांच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप इराणनं केला. त्यामुळे इराणमध्ये दहशतवादी घटना घडत आहेत. मात्र, पाकिस्तान हे आरोप फेटाळून लावत आहे. उलट शिया दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे.

हे वाचलंत का :

  1. पाकिस्तानला दणका; सीमा भागातील दहशतवादी तळांवर इराणचा 'सर्जिकल स्ट्राईक'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.