ETV Bharat / international

पाकिस्तानला दणका; सीमा भागातील दहशतवादी तळांवर इराणचा 'सर्जिकल स्ट्राईक'

author img

By ANI

Published : Jan 17, 2024, 7:25 AM IST

Updated : Jan 19, 2024, 12:07 PM IST

Iran Strikes Terrorist Group Bases : इराणनं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्रानं हल्ला केला. इराणनं केलेल्या या हल्ल्यात सीमा भागातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

Iran Strikes Terrorist Group Bases
संग्रहित छायाचित्र

तेहरान Iran Strikes Terrorist Group Bases : पाकिस्तानातील सीमा भागात असलेल्या दहशतवादी तळांवर इराणने हल्ला केला आहे. इराणनं केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिलं होतं. मात्र त्यानंतर हे वृत्त हटवण्यात आलं. इराणनं तेहरानला विरोध करणाऱ्या जैश अल अदल या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवादी संघटनेच्या दोन्ही तळांना उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती या वृत्तात नमूद करण्यात आली होती.

इराणच्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त : इराणनं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे दोन मुख्यालयं उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली. बलुचिस्तानात जैश अल अदलचे सर्वात मोठे मुख्यालय होते. असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं होतं.

जैश अल अदलनं केली होती 11 पोलिसांची हत्या : इराणनं जैश अल अदल या संघटनेला दहशतवादी संघटना असल्याचं घोषित केलं आहे. जैश अल अदल संघटनेनं 2012 मध्ये सिस्तान बलुचिस्तान या प्रांतात एका पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात तब्बल 11 पोलिसांचा बळी गेला होता. जैश अल अदल हा एक सुन्नी दहशतवादी संघटना असल्याचं इराणच्या वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं आहे. ही संघटना इराणच्या आग्नेय प्रांतात सिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर संघर्ष : इराणच्या आग्नेय प्रांतात जैश अल अदल ही संघटना आपला तळ ठोकून आहे. सिस्तान बलुचिस्तानची सीमा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला लागून आहे. या प्रांतात इराणचं सैन्य आणि सुन्नी दहशतवादी तसंच अमली पदार्थ तस्करांमध्ये नेहमीच संघर्ष होत असल्याचं पहायला मिळते. सिस्तान बलुचिस्तान हा इराणमधील सर्वात गरीब प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे.

हेही वाचा :

  1. Iran to buy Russias Sukhoi Jets: इराण- रशियात मोठा लढाऊ विमान सौदा, सुखोई एसयू-३५ जेट्सची करणार खरेदी
  2. इराणमध्ये जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ भीषण स्फोट, 100 हून अधिक जणांचा मृत्यू
  3. जैसलमेरमध्ये आणण्यात आलेले इराणमधील सर्व भारतीय कोरोना 'निगेटिव्ह'!
Last Updated :Jan 19, 2024, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.