ETV Bharat / entertainment

"अयोध्येत मी माझ्या पूर्वजांचे प्रतिनिधित्व करीन": अनुपम खेर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 10:51 AM IST

अभिनेता अनुपम खेरला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. या मंदिरात काश्मिरी पंडित आणि आपल्या पूर्वजांचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं त्यानं म्हटलंय.

Anupam Kher
अनुपम खेर

मुंबई - अभिनेता अनुपम खेर 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहे. त्याने आपला हा उत्साह चाहत्यांसोबत शेअर करताना X या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अनुपम श्रीरामाचं पुन्हा आयोध्येत परतण्यावर एक कविता सादर करताना दिसतो.

अनुपम खेरने हिंदीत एक लांबलचक चिठ्ठीही लिहिली आहे, "जय श्री राम! मी २२ जानेवारीला अयोध्येत माझ्या पूर्वजांचे आणि विशेषतः माझे आजोबा पंडित अमरनाथजींचे प्रतिनिधित्व करीन! या सर्वांचे राम मंदिर स्थापनेचे स्वप्न होते! माझ्या सर्व काश्मिरी हिंदू बंधू-भगिनी यावेळी आत्म्याने माझ्याबरोबर असतील!"

  • जय श्री राम!
    मैं 22 जनवरी को अयोध्या अपने पूर्वजों और ख़ासकर अपने दादा जी पंडित अमरनाथ जी का प्रतिनिधित्व करूँगा! ये सब राम मंदिर की स्थापना का सपना देखते थे! मेरे सभी कश्मीरी हिंदू भाई बहन आत्मिक रूप से मेरे साथ होंगे! 🙏
    श्री राम लल्ला का अयोध्या लौटना यह विश्वास जगाता है कि,… pic.twitter.com/If8BVdmjvD

    — Anupam Kher (@AnupamPKher) January 18, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"श्रीराम लल्ला यांचे अयोध्येतील पुनरागमन हा आत्मविश्वास जागृत करते की, ज्याने त्यांची एखादी अवधपुरी कुठेतरी सोडली असेल, त्याला एक दिवस ती नक्कीच सापडते. या ऐतिहासिक सोहळ्यात मला सहभागी होण्याची संधी मिळाली हा श्रीरामाचा आशीर्वाद आहे. हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी मिळाली. मी तुमच्या सर्वांसाठीही प्रार्थना करेन, " असे तो पुढे म्हणाला.

अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणदीप हुडा, अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हजर राहण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.

अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या आठवडाभर आधी मंगळवारी सुरू झाले. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी 'दर्शना'साठी खुले होणार आहे.

"'प्राण प्रतिष्ठा'ची सांगता दुपारी 1 वाजेपर्यंत होणे अपेक्षित आहे. समारंभानंतर पंतप्रधान मोदी आणि इतर उपस्थित आपले मनोगत व्यक्त करतील. परंपरेनुसार नेपाळच्या जनकपूर आणि मिथिला भागातून 1000 टोपल्यांमध्ये भेटवस्तू आल्या आहेत. 20 आणि 21 जानेवारी रोजी दर्शन लोकांसाठी बंद राहील,” असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील मंदिरात श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू केला आहे.

हेही वाचा -

  1. वाढदिवशी आई प्रियांका आणि बाबा निकसह चिमुकली मालती मेरी देवीच्या चरणी लीन
  2. 'इंडियन 2' ते 'थंगलान'सारखे अतिभव्य चित्रपट झळकणार ओटीटीवर
  3. मयुरी देशमुख, भूषण प्रधान आणि सिद्धार्थ जाधव स्टारर 'लग्नकल्लोळ'चे मोशन पोस्टर लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.