ETV Bharat / entertainment

'इंडियन 2' ते 'थंगलान'सारखे अतिभव्य चित्रपट झळकणार ओटीटीवर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 5:37 PM IST

South Movies on OTT : 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, काही साऊथ चित्रपटांचे नेटफ्लिक्सवर प्रदर्शन निश्चित झाले आहे. त्यामुळे ज्यांना ओटीटी रिलीजची प्रतीक्षा असते त्यांच्यासाठी हा खजिना आधीच उलगडण्यात आलाय.

South Movies on OTT
ओटीटीवर साऊथ चित्रपट

मुंबई - South Movies on OTT : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून यावर्षी अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हे सर्व चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होतील. 17 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर 8 साऊथ चित्रपटांचे पोस्टर्स शेअर केले आहेत. हे सर्व चित्रपट लवकरच त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थिएटरनंतर दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. चला जाणून घेऊया कुठले चित्रपट प्रदर्शित होतील.

इंडियन 2 : साऊथ अभिनेता कमल हासन आणि दिग्दर्शक शंकर यांची जोडी पुन्हा एकदा खळबळ माजवणार आहे. 'इंडियन 2' या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु याआधी नेटफ्लिक्सने म्हटलं आहे की, हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, ओटीटीवर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रसारित केला जाईल.

थंगलान : तमिळ अभिनेता विक्रमची मुख्य भूमिका असलेल्या 'थंगलन' या बहुप्रतीक्षित चित्रपटाची बरेची चर्चा सध्या सुरू आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून पाहत आहेत. 'थंगलन' हा यापूर्वी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार होता आणि आता हा चित्रपट एप्रिल 2024 मध्ये प्रदर्शित होईल. यानंतर हा चित्रपट ओटीटीवर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रसारित केले जाईल.

एसके 21 : साऊथ अभिनेता शिवकार्तिकेयनचा पुढील चित्रपट 'एसके 21' (शीर्षकरहित चित्रपट), हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रसारित केला जाईल. या चित्रपटाचे निर्माते कमल हासन, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन आणि एआर महेंद्रन आहेत. राजकुमार पेरीसामी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

रिवोल्वर रीता : साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश स्टारर चित्रपट 'रिवोल्वर रीता' नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रसारित केला जाणार आहे. हा चित्रपट 30 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन के चंद्रू यांनी केलं आहे.

महाराजा : तमिळ अभिनेता विजय सेतुपती 'महाराजा' या चित्रपटात दिसणार आहे. नितिलन स्वामीनाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील असणार आहे. थिएटरनंतर, हा चित्रपट ओटीटीवर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित केला जाईल.

कन्नीवेदी : अभिनेत्री कीर्ती सुरेश स्टारर 'कान्निवेदी' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. गणेश राज हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू आहेत. हा चित्रपट ओटीटीवर तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रसारित केला जाईल.

विदा मूयार्ची : अभिनेता अजित कुमार, त्रिशा कृष्णन, रेजिना कॅसांड्रा, अर्जुन दास, अरुण विजय, अर्जुन सर्जा यासारख्या तगड्या स्टारकास्टसह 'विदा मूयार्ची' हा चित्रपट तमिळ भाषेत थिएटरमध्ये रिलीज काही दिवसात होईल. त्यानंतर 'विदा मूयार्ची' चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्व भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहिला मिळेल.

कन्यूजरिंग कन्नपन : सेल्वन राज झेवियर दिग्दर्शित रहस्यमय चित्रपट 'कन्यूजरिंग कन्नपन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

सोरगावासल : आर. जे. बालाजीची आणि सिद्धार्थ विश्वनाथचा चित्रपट 'सोरगावासल' थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रवाहित होईल.

हेही वाचा :

  1. 'फायटर' चित्रपटातील खलनायकाचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज
  2. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी जागवली लतादीदींची आठवण
  3. 'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.